टीम मंगळवेढा टाईम्स ।
दिवाळी म्हणजे आनंदाला उधाण. यंदा भाऊबीज अन् दिवाळी: पाडवा एकाच दिवशी म्हणजे दि.२६ ऑक्टोबरला आहे. त्यामुळे बहिणीला ओवाळणी अन् पत्नीला दिवाळी भेट देण्याचा आनंद एकाच दिवशी मिळणार आहे.
दि.२४ ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन होणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली.
आजच करा खरेदी-
यावर्षी वसुबारस दि.२१ ऑक्टोबरला शुक्रवारी आहे. मुंबई , पुणे , नाशिककडील काही प्रदेशांत धनत्रयोदशी दि. २२ ऑक्टोबरला शनिवारी आहे, तर सोलापूर , मराठवाडा औरंगाबाद, आणि विदर्भाकडील काही भागात दि.२३ ऑक्टोबरला रविवारी धनत्रयोदशी आहे.
नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन सोमवारी दि.२४ ऑक्टोबर या एकाच दिवशी आलेले आहे. दि.२५ ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण असून, हे ग्रहण भारतात सर्वत्र दिसणार आहे.
२५ ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण
दि.२५ ऑक्टोबरला सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे. हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा.
भरगच्च डिस्काउंट मध्ये या दिवाळीत घरी आणा आवडती वस्तू –
बाल , वृद्ध , अशक्त , आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये, स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ . करता येतील, तसेच पाणी पिणे, झोपणे , मलमूत्रोत्सर्ग करता येईल.
लक्ष्मीपूजन, वहिपूजनाचे मुहूर्त
लक्ष्मीपूजन दि.२४ ऑक्टोबरला असून, या दिवशी दुपारी ३ ते सायंकाळी ६ आणि रात्री ८.३० ते १२ या काळात पूजन करता येईल. दि.२६ ऑक्टोबरला पहाटे ३.३० ते ६.३० , तसेच सकाळी ६.३० ते ९ .३० आणि सकाळी ११ ते दुपारी १२.३० दरम्यान वहीपूजन करता येईल , असे दाते यांनी सांगितले,
या ग्रहणाचे वेध मंगळवारी पहाटेपासून असल्याने सोमवारी परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन करून प्रसाद घेण्यास अडचण नाही.
तसेच मंगळवारी सूर्यास्तानंतर वेध संपत असल्याने बुधवारी पहाटे दिवाळी पाडव्यानिमित्त केले जाणारे वहीपूजनदेखील परंपरेप्रमाणे करता येईल. पाडव्यानिमित्त केले जाणारे सर्व धार्मिक उत्सव परंपरेप्रमाणे करता येतील.
आपल्या मुलांना द्या सुवर्णप्रशांनचा डोस; फरक अनभवा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज