mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 21, 2026
in क्राईम, मंगळवेढा, राज्य, सोलापूर
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मंगळवेढा टाईम्स न्युज ।

नंदेश्वर (ता. मंगळवेढा) येथील दहावीच्या परीक्षा केंद्रावर दि. 20 फेब्रुवारी रोजी झालेल्या मराठी विषयाच्या परीक्षेत तब्बल 10 बोगस विद्यार्थी परीक्षा देत असल्याचा प्रकार समोर आला असून याप्रसंगी 20 जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सर्व विद्यार्थी सुतार इंटरनॅशनल स्कूल, लक्ष्मी दहिवडी येथील असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या बोगस विद्यार्थ्यांच्या प्रकरणात लक्ष्मी दहिवडी येथील शाळाच केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे 10 वी परीक्षेचे केंद्र क्रमांक 3184 आहे. केंद्र संचालक विठ्ठल निवृत्ती एकमल्ले व उपकेंद्र संचालक यांनी परीक्षेदरम्यान प्रवेशपत्रे व ओळखपत्रांची तपासणी केली असता संशयास्पद बाबी आढळून आल्या.

त्यामध्ये लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल स्कूलचे नऊ विद्यार्थी व एक विद्यार्थिनी इतर परीक्षार्थींच्या नावावर मराठीचा पेपर सोडवत असल्याचे निष्पन्न झाले. मूळ परीक्षार्थी नंदेश्वर केंद्रावर अनुपस्थित असताना, त्यांच्या जागी दुसऱ्यांनाच बसवण्यात आल्याने हा प्रकार सुनियोजित असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.

पकडण्यात आलेल्या सर्व बोगस विद्यार्थ्यांवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच संबंधित मूळ परीक्षार्थी, शाळा प्रशासन व या गैरप्रकारामागील सूत्रधारांची चौकशी होणार आहे.

या संपूर्ण प्रकरणाची माहिती मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे. पुढील तपासाची दिशा आता लक्ष्मी दहिवडीतील शाळेकडे वळली आहे.

दरम्यान, दहावी सारख्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेत लक्ष्मी दहिवडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचा थेट सहभाग आढळल्याने शिक्षण व्यवस्थेवर काळा डाग लागला आहे. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या प्रकारात शाळा प्रशासनाची भूमिका काय? बोगस विद्यार्थ्यांची निवड कोणी केली? आर्थिक व्यवहार झाले का? असे अनेक जळजळीत प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

प्रत्येक वर्गखोलीत तोतया परीक्षार्थी

नंदेश्वर परीक्षा केंद्रावर एकूण 14 वर्गखोल्यांमध्ये दहावीची परीक्षा सुरू होती. सुरुवातीला खोली क्रमांक 8 मध्ये दोन संशयित विद्यार्थी सापडले. यानंतर संपूर्ण केंद्रात तपासणी सुरू करण्यात आली. त्यावेळी जवळपास प्रत्येक वर्गखोलीत बोगस परीक्षार्थी आढळून आले. त्यामुळे हा प्रकार काही मोजक्या व्यक्तींचा नसून, लक्ष्मी दहिवडी येथील शाळेतूनच नियोजनबद्धरीत्या तोतया विद्यार्थी पाठवले गेले का, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

♦️ आरोपी नाव पत्ता –
1) रोहित किशोर चौधरी , 2) प्रज्योत शंकर जाधव , 3) राकेश भारत कुंभार, 4) मंगेश अनंत कदम, 5) तुकाराम यशवंत थोरवे, 6) भक्ती श्रीकांत जोशी, 7) निखिल नामदेव पाटील, 8) प्रतिक नामदेव मंडले, 9) श्रीकांत संतोष सावंत, 10) शुभम दिलीप जांगळे

आरोपी क्र 1 ते 10 यांचा पत्ता माहिती नाही.

11) विश्वजीत उर्फ बाबू प्रवीण चव्हाण रा पिरवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर, 12) वैभव अर्जुन पवार रा चिन्मय पार्क सांगली, 13) सचिन तुकाराम बोदगिरे रा कोळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर, 14) प्रकाश किसन अडळगी रा अरळीहट्टी ता अथनी जि बेळगाव, 15) समाधान भारत रुपनर  रा केरळकर पेट्रोल पंपाजवळ सांगली, 16) प्रीती बसवराज बिराजदार रा चाणक्य चौक सांगली, 17) आकाश संजय पाटील रा तिरंगा चौक ईश्वरपूर जि सांगली, 18) प्रकाश बसवराज बिराजदार रा चाणक्य चौक सांगली, 19) धर्मात्मा चंद्रशेखर आझाद रा इचलकरंजी जि कोल्हापूर, 20) रोहित दिलीप बांदल राहणार जांभूळवाडी पेठ ईश्वरपूर जि सांगली

बाळकृष्ण विदयालय, नंदेश्वर येथे इयत्ता दहावी बोर्डाचे परीक्षेकरीता एस.एस.सी. बोर्ड, पुणे यांचेकडुन केंद्र संचालक म्हणुन फिर्यादी यांची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र संचालक म्हणुन परीक्षा केंद्रामध्ये होणा-या दहावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्याची संपुर्ण जबाबदारी असल्यामुळे मदती करीता सहा. केद्र संचालक म्हणुन श्री.मारुती दत्तु निकम सर नेमणुक इंग्लिश स्कुल भोसे यांची नेमणुक असुन मदतीला एकुन 25 पर्यवेक्षक शिक्षक नेमण्यात आले आहेत.

सदर बोर्डाच्या परीक्षेकरीता बाळकृष्ण विदयालय नंदेश्वर एस.एस.सी.बोर्ड परीक्षा केंद्र क्र.3184 देण्यात आलेले आहे. आज दि.20/02/2026 रोजी इयत्ता दहावी मराठी विषयाचा पेपर सकाळी 11.00 वाजता सुरू झाला होता. त्यावेळी सहकारी श्री. मारूती दत्तु निकम सर असे आमच्याकडे असलेल्या बोर्डाच्या परीक्षार्थी यांच्या यादीनुसार, परिक्षेकरिता बसलेल्या विद्यार्थांचे हॉल तिकिट व त्यांचे शाळेचे ओळखपत्र यांची तपासणी करित असताना

प्रथम खोली क्र.1 पर्यवेक्षक कृष्णदेव गोपीनाथ हेंबाडे सर यांचे मदतीने सदर खोली मधील परीक्षार्थीचे हॉल तिकीट तपासत असताना,1. परीक्षा क्रमांक- C262502 परीक्षार्थीचे नाव रोहीत किशोर चौधरी याचे नावावर, विश्वजित उर्फ बाबु प्रविण चव्हाण हा तोतया विदयार्थी परीक्षा देत असताना मिळुन आला.

त्यानंतर आम्ही खोली क्र.2 पर्यवेक्षक पवनकुमार सुरेश पाडवी सर यांचे मदतीने परीक्षार्थीचे हॉल तिकीट तपासत असताना, सदर वर्गात 2. परीक्षा क्रमांक- C262523 परीक्षार्थीचे नाव प्रज्योत शंकर जाधव याचे नावावर, वैभव अर्जुन पवार हा तोतया विदयार्थी तसेच 3  परीक्षा क्रमांक- C262524 परीक्षार्थीचे नाव राकेश भारत कुंभार याचे नावावर, सचिन तुकाराम बोदगरे हा तोतया विदयार्थी परीक्षा देत असताना मिळुन आला त्याच्याकडे आयकार्ड मिळुन आले नाही.

खोली क्र.5 पर्यवेक्षक ज्ञानोबा शिवराम तांबे सर यांचे मदतीने परीक्षार्थीचे हॉल तिकीट तपासत असताना, 4. परीक्षा क्रमांक- C262610 परीक्षार्थीचे नाव मंगेश अनंत कदम याचे नावावर, प्रकाश किसन अडलगी हा तोतया विदयार्थी परीक्षा देत असताना मिळुन आला.

त्या नंतर खोली क्र.7 पर्यवेक्षक राजाराम भाउसाहेब काकडे सर मधील परीक्षार्थीचे हॉल तिकीट तपासत असताना, सदर वर्गात 5. परीक्षा क्रमांक- C262666 परीक्षार्थीचे नाव तुकाराम यशवंत थोरवे याचे नावावर, समाधान भारत रूपनर हा तोतया विदयार्थी परीक्षा देत असताना मिळुन आला.

त्याच्याकडे हॉल तिकीट व आयकार्ड मागितले असता त्याने त्याचेकडे हॉल तिकीट व आयकार्ड नसल्याचे सांगितले. खोली क्र. 8 पर्यवेक्षक अर्जुन पांडुरंग खांडेकर सर यांचे मदतीने परीक्षार्थीचे हॉल तिकीट तपासत असताना, 6. परीक्षा क्रमांक- C262677 परीक्षार्थीचे नाव भक्ती श्रीकांत जोशी हिचे नावावर, प्रिती बसवराज बिराजदार ही तोतया विदयार्थीनी परीक्षा देत असताना मिळुन आली

तसेच सदर वर्गात 7. परीक्षा क्रमांक-C262671 परीक्षार्थीचे नाव निखिल नामदेव पाटील याचे नावावर आकाश संजय पाटील हा तोतया विदयार्थी परीक्षा देत असताना मिळुन आला. तसेच खोली क्र. 10 पर्यवेक्षक विश्वास शिवाजी भगरे सर यांचे मदतीने परीक्षार्थीचे हॉल तिकीट तपासत असताना, सदर वर्गात 8. परीक्षा क्रमांक-C262736 परीक्षार्थीचे नाव प्रतिक नामदेव मंडले याचे नावावर, प्रकाश बसवराज बिराजदार हा तोतया विदयार्थी परीक्षा देत असताना मिळुन आला त्याच्याकडे आयकार्ड मिळुन आले नाही.

खोली क्र. 11 पर्यवेक्षक नारायण महादेव गुजले सर यांचे मदतीने परीक्षार्थीचे हॉल तिकीट तपासत असताना, 9. परीक्षा क्रमांक- C262743 परीक्षार्थीचे नाव श्रीकांत संतोष सावंत याचे नावावर, धर्मात्मा चंद्रशेखर आझाद हा तोतया विदयार्थी परीक्षा देत असताना मिळुन आला.

खोली क्र.14 पर्यवेक्षक किरण बाजीराव नागणे सर यांचे मदतीने परीक्षार्थीचे हॉल तिकीट तपासत असताना, सदर वर्गात 10. परीक्षा क्रमांक- C400273 परीक्षार्थीचे नाव शुभम दिलीप जांगळे याचे नावावर, रोहीत दिलीप बादल हा तोतया विदयार्थी परीक्षा देत असताना मिळुन आला.

त्यानंतर आम्ही एस.एस.सी. बोर्डाचे ऑनलाईन वेबसाईटला जावुन वरील नमुद परीक्षार्थीचे हॉल तिकीट पाहून खात्री केली असता, नमुद परीक्षार्थीचे कडे मिळालेले हॉल तिकीट वरील फोटो व ऑनलाईन वेबसाईटवरील हॉल तिकीटावरील फोटो यामध्ये तफावत आढळुन आली. वरील सर्व तोतया परीक्षार्थी यांचेकडे मिळुन आलेले हॉल तिकीटावर Principal Sutar Internationl School & Junior college Laxmi Dahiwadi Tal. Mangalwedha Dist – Solapur असे रबरी शिक्का असुन त्यावर सही केलेली असून त्यापैकी तोतया परीक्षार्थी रोहीत दिलीप बादल याचेकडे मिळालेले हॉल तिकीटची झेरॉक्स प्रत मिळाली व बाकी तोतया विदयार्थी यांचेकडे मिळालेल्या हॉल तिकीटावर वरील नमुद निळ्या रंगाचा शिक्का मारलेला आढळुन आला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: दहावी तोतया विद्यार्थी

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 11, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

पुनर्वसनाच्या जमिनीवर डोळा! जमीन तुमची, आधार कार्ड खोटे अन् अंगठा दुसऱ्याचाच; मंगळवेढ्यात उजनी जमीन घोटाळ्याचा थरार, वाचून थक्क व्हाल; एजंट मालामाल

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
Next Post
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेत आणि पाणंद रस्त्यांसाठी प्रशासकीय हालचालींना वेग; शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन; आमदार आवताडेंचा शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढाकार

ताज्या बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती,भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

उजनी पुनर्वसन जमीन घोटाळा! डमी खरेदीचे मोठे रॅकेट; एजंट झाले ‘मालामाल’, संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय सखोल चौकशीची जनतेतून तीव्र मागणी

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
Transfer! मंगळवेढा पोलिस ठाण्याकडील ‘या’ पोलिस कर्मचार्‍यांच्या अन्यत्र बदल्या; नवीन ‘हे’ आले

मंगळवेढ्यात बुलेट राजांना दणका! पोलिसांची धडक कारवाई; मॉडिफाईड सायलेन्सर अन् विना नंबर प्लेटच्या ‘या’ वाहनांवर ‘ॲक्शन’

July 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी गूडन्यूज! कर्जमाफीच्या दोन अटी केल्या रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कुणाला मिळणार फायदा?

July 11, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वाढणार? मोदींच्या सल्लागार परिषदेचा मोठा अहवाल; पण ‘या’ महिलांसाठी चिंतेची बातमी

July 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा