टीम मंगळवेढा टाईम्स ।
एसटी बसमध्ये चढताना दोन महिलांनी प्रवासी अनोळखी ढकलाढकली करीत महिलेच्या पर्समधून साडेसात तोळ्याचे दागिने लंपास केले.
ही घटना ताजी असताना पुन्हा दोन अनोळखी महिलांनी महिलेच्या पर्सवर ओढणी टाकून ४० हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले.
ही घटना सकाळी ११ वा. च्या सुमारास महात्मा फुले चौक , सांगोला येथे घडली. याबाबत संगीता दिलीप कसबे यांनी अनोळखी दोन अज्ञात महिलांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
संगीता दिलीप कसबे (लाइन बाजार , ता.करवीर,जि.कोल्हापूर) या वाकी घेरडी (ता.सांगोला ) येथे माहेरी आल्या होत्या.
दि.६ जून रोजी सकाळी ११ वा. च्या सुमारास त्यांनी सांगोला येथील सोने-चांदीच्या दुकानातून जुने सोने मोडून नवीन ४ ग्रॅम सोन्याची अंगठी व ४ ग्रॅम सोन्याची चैन असे ४० हजार रुपयांचे दागिने खरेदी केले.
हे दागिने त्यांनी पर्समध्ये ठेवून वाकी घेरडी येथे जाण्यासाठी सांगोला बस स्टॅण्डकडे निघाल्या.
त्या फुले चौकात चप्पल शिवण्यासाठी थांबल्या पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या पर्सवर ओढणी टाकून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज