टीम मंगळवेढा टाईम्स ।
गुप्तधन काढून देण्याचे आमिष दाखवून ६१ लाख ७० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित भोंदूबाबा मोहम्मद शेख याला पोलिस उपनिरीक्षक अमोल बामणे यांच्या पथकाने सांगली येथून ताब्यात घेतले.
गुरुवारी रात्री त्यास अटक केली . आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, त्याने फसवणुकीची रक्कम जुगार, मटका खेळण्यात उधळल्याची माहिती मिळाली आहे. तपासांती त्याचा उलगडा होणार आहे.
लक्ष्मण रामचंद्र माने, (रा.सलगर खुर्द) यांच्या शेतात संशयितांनी १३ जुलै २०२१ ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत पूजा केली होती. त्यांच्या मेहुण्याच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केले होते.
त्याच्या बदल्यात नकली सोन्याचे दागिने देऊन जीवितास धोका होईल अशी भीती दाखवली होती. तसेच गुप्तधन काढून देण्यासाठी ६१ लाख ७० हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती. याप्रकरणी १ ९ जानेवारी रोजी चौघांवर गुन्हा दाखल केला होता. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज