टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे माहेरी आलेल्या एका 33 वर्षीय विवाहित महिलेवर शेतातील वस्तीमध्ये जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी बिराप्पा जकराया सोमुत्ते याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील पिडीत महिला ही हुलजंती या आपल्या माहेरी गावी आली होती.
ती पौट शिवारात असलेल्या शेताकडे जावून डाळिंबीची बाग पहात थांबली होती.
थोडयाच वेळाने सदर पिडीत महिला ही शेडसमोर बसली असता आरोपीने मोटर सायकलवर येवून तु माझेबरोबर राहशील का,तुला मी फोन केल्यावर तु फोन का उचलत नाही,
नाही उचल्यास जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पिडीतचा हात धरून ओढत पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन व तोंड दाबून जबरदस्तीने शरीरसंबंध केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून
जाताना कोणाला काही सांगितले तर बघ? असे म्हणून धमकी देवून निघून गेला आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज