टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील नगरपालिका मंगळवेढा यांनी दामाजी चौक ते धान्य गोडाऊनपर्यंत भुयारी गटारीचे काम केले ते काम निकृष्ट दर्जाचे आहे व त्यातील मुरुम चोरीला गेला व मंगळवेढा तहसील कार्यालय समोरील पाण्याच्या टाकीचे काम गेली कित्येक दिवस सुरू आहे
त्याचा कालावधी संपला आहे तरी ते पूर्ण होत नाही त्यामुळे प्रहार संघटनेकडून त्या विरोधात आवाज उठवला व धरणे आंदोलन सुरू झाले त्या ठेकेदाराला दिनांक 13 ऑगस्ट 2024 पासून दररोज पाचशे रुपये दंड आकारण्यात आला.
नंतर शहरातील गतिरोधक निघुन गेले तर त्या ठेकेदाराला एक रुपया ही बिल दिले नाही असे लेखी दिले व बालाजी नगर येथील सार्वजनिक वाचनालयात माजी सरपंचाचा संसार होता तो आंदोलन सुरू झाल्यानंतर मंगळवेढा गटविकास अधिकारी यांनी बाहेर काढला आहे
व आमदार भारत भालके अकॅडमी यांनी सांस्कृतिक भवनात चालवत असल्याचा निदर्शनास आल्यामुळे त्याही अकॅडमी चालकाला दंड ठोठावण्यात आला आहे.
तर समाज मंदिरात खाजगी पतसंस्था चालते त्याची चौकशी समिती नेमली गेली आहे व बालाजी नगर येथील पोलीस पाटलाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू असे लेखी आश्वासन मंगळवेढा उपविभागीय अधिकारी बि.आर माळी यांनी दिले.
यावेळी आमदार समाधान आवताडे यांचे बंधू संजय आवताडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावून हे आंदोलन मागे घेण्यास विनंती केली गेली सात दिवस चालू असलेले आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती लेखी आश्वासन देऊन मंगळवेढा प्रांताधिकारी यांनी केली.
यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी मंगळवेढा उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते लेखी आश्वासन देत असताना सोबत उद्योजक संजय आवताडे,
मंगळवेढा नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी विनायक साळुंखे, बांधकाम अधिकारी प्रशांत सोनटक्के , मंगळवेढा वैद्यकीय अधिकारी जानकर साहेब व उपविभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
यावेळी प्रहार अपंग क्रांतीचे जिल्हा उपाध्यक्ष सिदराया माळी, प्रहार संघटनेचे मंगळवेढा तालुका अध्यक्ष समाधान हेंबाडे ,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष राकेश पाटील ,प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष संजय राठोड,
शहराध्यक्ष युवराज टेकाळे, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे ,अनिल दोडमिसे, अजय राठोड, मनसेचे देवदत्त पवार, धनंजय माने ,शिवसेनेचे कुदळे व इतर प्रहार चे कार्यकर्ते उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज