टीम मंगळवेढा टाईम्स ।
बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा संपल्या असून त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील १ हजार ८९ माध्यमिक शाळांमधील साडेचार लाख तर प्राथमिक शाळांमधील सव्वादोन लाख विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा एप्रिलच्या १२ तारखेपर्यंत घेतल्या जाणार आहेत.
दि.१ मेपासून शाळांना उन्हाळा सुटी असणार आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून चिमुकल्यांना आता उन्हाळा सुटीचे वेध लागले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची शेवटची सत्र परीक्षा ३१ मार्चपासून सुरु होणार आहे. १२ एप्रिलपर्यंत त्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा संपेल, असे नियोजन जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांनी केले आहे.
नववीतून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे जादा तास संबंधित शाळा स्वेच्छेने घेतील. दुसरीकडे जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्र परीक्षा १३ एप्रिलपूर्वी संपविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सत्र परीक्षा उरकण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यातून विद्यार्थ्यांची प्रगती समजणार असून पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लक्ष देणे सोयीचे होणार आहे. परीक्षा संपल्यानंतर निकाल तयार करून १ मे रोजी तो प्रसिद्ध होईल. १ मे ते ११ जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुटी असणार आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळांना १ मेपासून उन्हाळा सुटी असणार आहे. त्यानंतर १२ जूनपासून २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल.
दरम्यान, कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी उन्हाळा सुटीत शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपर्कात राहून त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे आहे.
जेणेकरून पटसंख्या कमी होणार नाही, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढणार नाही, हा त्यामागील हेतू आहे.
३१ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत चालणार सत्र परीक्षा
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा ३१ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत घेतली जाणार आहे. त्यानुसार सर्व माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापकांनी नियोजन केले आहे. १ मे रोजी विद्यार्थ्यांना निकालपत्रक वितरीत केले जातील.- तानाजी माने, जिल्हाध्यक्ष, माध्यमिक व उच्च मुख्याध्यापक संघ, सोलापूर
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज