टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने चालविणेत आलेल्या हमीभाव हरभरा खरेदी केंद्रावरती कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे खरेदी करता आलेली नाही
परंतु शासनाने हमीभाव खरेदी केंद्रावरती नावनोंदणी करु न शकलेल्या शेतक-यांसाठी दिनांक १८ जुन २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली.
असुन सदरचा हरभरा खरेदीसाठी २५ जुन २०२१ पर्येंत मुदतवाढ दिलेली आहे तरी शेतक-यांनी आँनलाईन नावनोंदणी साठी मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ कार्यालयामध्ये संपर्क साधावा.
तसेच नावनोंदणीसाठी शेतक-यांनी हरभरा या पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुकची स्पष्ट दिसत असणारे झेरॉक्स व मोबाईल नंबर ची आवश्यकता आहे.
या खरेदी केंद्रामुळे मंगळवेढा तालुक्यासह अन्य तालुक्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ कार्यालयाच्या विभागाकडून एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतक-यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणायचा आहे.
त्यानंतर विक्री केलेल्या हरभरा या पिकाची रक्कम ऑनलाईन शेतक-यानी दिलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे हरभरा या धान्यासाठी आधारभूत किंमत ५१००/- रुपये आहे.
खरेदी केंद्रांच्या अधिक माहिती साठी कृषि उद्योग सहकारी संघाचे व्यवस्थापक हणमंत मासाळ 96657 41960 शंभुमामा नागणे ९४०५२१४५९५, मच्छिंद्र कोंडुभैरी ९८९०८३१९३४ ( ९०२८५०९७७७ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन चेअरमन बबनराव आवताडे यांनी केले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज