टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी संघटना,अपंग क्रांती संघटना यांनी मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर येथील पोलीस पाटील हा बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय करीत आहे.
या बोगस डॉक्टर ची पाठराखण हे सर्व अधिकारी करत आहेत. कारण ह्या अधिकारी लोकांना नरड्याला येईपर्यंत मलिदा पुरवत असणारा हा बोगस डॉक्टर आहे. त्यामुळे हे अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.
तर दुसरीकडे मंगळवेढा नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे त्या मुरुम चोरणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यास का टाळाटाळ करीत आहेत हे लक्षात येईना झाले आहे. दामाजी चौकातुन त्या गटारीचे पाणी ही जात नाही तरीपण त्यांना दंड होत नाही.
व पाण्याची टाकी गेले कित्येक दिवस पुर्ण होऊन चालु नाही. ती कधी चालू करणार याचेही उत्तर मुख्याधिकारी देत नाहीत. तर कृष्ण तलावावरील सुशोभिकरणाचे ब्लाॅक हे निघुन गेले आहेत.
अधिकारी हे त्या ठेकेदाराला काहीही बोलत नाहीत. त्यामुळे पोलिस पाटील, मुरुम चोर, कृष्ण तलावावरील ठेकेदार यांच्या वर जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार अशी ठाम भूमिका प्रहारचे सिदराया माळी यांनी घेतली आहे.
या आंदोलनात प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय राठोड, शहराध्यक्ष युवराज टेकाळे, तालुका उपाध्यक्ष रोहिदास कांबळे, तालुका संपर्क प्रमुख शकिल खाटीक,अजय राठोड,
सुरेश राठोड, सचिन पवार,अशिष पवार,अक्षय पवार, हुसेन नदाफ, नवनाथ पवार,रविनाथ पवार,आकाश पवार,अकबर नदाफ,मस्तान नदाफ, रामहरी घुले,हसन नदाफ, इस्माईल नदाफ, अनिल दोडमिसे, धनंजय माने,नागेश मुदगुल, सतिश जावळे आंदोलनात सहभागी आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज