टीम मंगळवेढा टाईम्स ।
जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत नाविण्यपुर्ण योजनेतून मंगळवेढा क्रिडा संकुल(इंग्लिश स्कूल) येथे इलेक्ट्रीक पोल उभा करून एल.ई.डी. मर्क्युरी बसविणे कामास 52.36 लाख रुपये निधी मिळालेची माहिती नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप यांनी दिली.
मंगळवेढा तालुका क्रिडा संकुल येथे रात्रीच्या स्पर्धा घेता याव्या याकरिता इलेक्ट्रीक पोल उभा करणे व मर्क्युरी बसविणे या कामास निधी उपलब्ध करणेचा प्रस्ताव जिल्हा क्रिडा खात्याकडून जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर केला होता.
सदर प्रस्तावास जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांची मंजूरी दिली असून निधी वितरीत आदेशा ही देण्यात आला आहे.
तालुका क्रिडा संकुल येथे सदर सुविधा निर्माण व्हावी या करिता स्व.आ.भारत भालके यांनी मंजुरी करिता प्रयत्न केले होते.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून नाविन्यपुर्ण योजनेतून मंजूर आसलेल्या कामास प्रशासकिय मंजुरी देवून निधी वितरित करणे बाबतची विनंती जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप यांनी केली होती.
त्यानुसार सदर निधी वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले असून त्यानुसार लवकरच सदरचे काम सुरू होणार असून मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व क्षेत्रातल्या खेळाडूना सदरचे मैदान रात्रीच्या खेळांसाठी उपलब्ध होणार आहे.
सदरचे काम मंजूर करणे साठी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळूंखे पाटील, विठ्ठल कारखान्याचे चेरमन भगीरथ भालके, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, तहसिलदार स्वप्निल रावडे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उपाधिकारी दिलीप पवार सो,जिल्हा क्रिडा अधिकारी तारळकर, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी सदर काम मंजूरी साठी सहकार्य केले.
नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, बांधकाम समिती सभापती प्रविण खवतोडे, नियोजन सभापती अनिल बोदाडे, महिला व बालकल्याण सभापती भागिरथी नागणे, आरोग्य सभापती संकेत खटके व नगरसेविका अनिता नागणे, नगरसेविका राजश्री टाकणे, नगरसेविका सुमन श्रीरंग शिंदे, नगरसेविका फकीर सब्जपरी अरिफ, नगरसेवक पांडुरंग शिवाजी नाईकवाडी,
नगरसेविका लक्ष्मी बसप्पा म्हेत्रे, नगसेविका पारूबाई सिद्राम जाधव, नगरसेवक रामचंद्र बळीराम कोंडुभैरी, नगरसेविका निर्मला विष्णुपंत माने, नगसेविका रतन चंद्रकांत पडवळे, नगरसेवक प्रशांत सुभाष यादव, नगरसेवक बशीर हुसेन बागवान, नगसेवक राहुल अशोक सावंजी यांनी सदर कामे मंजुर करणेसाठी प्रयत्न केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज