मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुशील आवताडे यांची तर उपसभापती पदी नानासो राजाराम चोपडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
जेष्ठ नेते बबनराव आवताडे व आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखालील ही बाजार समिती राज्यात अग्र्रणी आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच होऊन आवताडे गटाकडे एकहाती सत्ता सभासदांनी दिली आहे.
आज सोमवारी नूतन संचालक मंडळाची पदाधिकारी निवडीसाठी बैठक सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी ए ए गावडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
यावेळी सभापती आवताडे व उपसभापती पदासाठी चोपडे यांचे दोघांचेच अर्ज आल्याने या दोघांची निवड बिनविरोध करण्यात आली. यावेळी सचिव म्हणून सचिन देशमुख यांनी कामकाज पाहिले.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समिती मंगळवेढाचे नुतन संचालक बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, मनोज चव्हाण, प्रकाश जुंदळे, धन्यकुमार पाटील, कविता बेदरे, सविता यादव, बिराप्पा माळी, सहदेव लवटे, गंगाधर काकणकी, जगन्नाथ रेवे, आनंद बिले, पांडुरंग कांबळे, बसवंत पाटील, प्रवीण कोंडुभैरी आदीजन उपस्थित होते.
निवडीनंतर सभापती सुशील आवताडे व उपसभापती नानासो चोपडे यांचा सत्कार करण्यात आला. सर्व संचालक मंडळाचा सत्कार यावेळी करण्यात आला.
सिध्देश्वर आवताडे यांनी ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडल्याबद्दल संचालक मंडळाचे तसेच निवडणूक यंत्रणेचे, आवताडे गटाच्या वतीने सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी दामाजीनगर ग्रामपंचायत सरपंच जमीर सुतार, उद्योजक दिलीप उघाडे, हॉटेल राजकीरणचे मालक नामदेव पडवळे, अँड.दत्ता तोडकरी, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, उद्योजक शैलेश अवताडे, प्रमोदकुमार म्हमाने, माजी उपसभापती शंकरराव मेटकरी, पंचायत समिती माजी सदस्य संजय पवार, लक्ष्मण हेंबाडे सर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
बाजार समितीत शेतकरी हिताला महत्त्व दिले जाणार
मंगळवेढा बाजार समिती राज्यात अग्रगण्य आहे. या बाजार समितीत शेतकरी हिताला महत्त्व दिले जाणार आहे. या बाजार समितीचा नावलौकिक चांगला आहे. यापुढेही आपण व आपले संचालक मंडळ बाजार समितीचा कारभार चांगलाच करतील. सभासदांनी आम्हाला सगळ्यांना बाजार समितीवर संधी दिली. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. – सुशील आवताडे, सभापती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज