मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील सलगर खु॥ येथे शेतजमीनीच्या कारणावरुन दोन गटात झालेल्या हाणामारीत एकमेकाविरुध्द 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या घटनेत दि. 21 रोजी सकाळ 10.30 वाजता यातील फिर्यादी गट नं.280/1/ब या शेतामध्ये ट्रॅक्टरने शेतीची मशागत करीत होते.
या दरम्यान आरोपीने येवून हे शेत आमचे आहे, तू शेतात मशागत करायची नाही असे म्हणून फिर्यादीच्या गच्चीला धरुन मारहाण करु लागले. त्यावेळी फिर्यादी आरडाओरडा करीत असताना आवाज ऐकून
आई मंगल कोळी,भाऊ विशेष कोळी हे भांडणे सोडविण्यासाठी आले असताना आई मंगल हिच्या डोक्यात सत्तूरने मारुन गंभीर जखमी केले.
तसेच विहिरीवर पडलेला गज घेवून फिर्यादीच्या कपाळावर उजव्या बाजूस मारुन त्यांनाही गंभीर जखमी करुन शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले असून
या प्रकरणी शिवाजी भुसनर,संतोष काटकर, सिध्देश्वर भुसनर,अमित काटकर,प्रविण दबडे, प्रदिप भुसनर,वैभव भुसनर,कोंडीबा काटकर, बाळासाहेब काटकर या नऊ जणाविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले.
दुसर्या घटनेत यातील फिर्यादी दयानंद कोळी हे दि.21 रोजी सकाळी 10.30 वाजता खरेदी केलेल्या गट नं.280/1क शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरत असताना फिर्यादी व फिर्यादीच्या आईने आरोपीस या जमिनीचा वाद कोर्टात चालू आहे.
तू जमीन नांगरू नको असे विचारले असता आईला लिंबाच्या काठीने उजव्या हाताच्या मनगटावर मारुन जखमी केले. ही भांडणे सुरु असताना आरोपीने तेथे येवून लाथाबुक्क्याने मारहाण केली.
तसेच तुम्हांला येथे ठेवणार नाही असे म्हणून आरोपीने विळ्याने नंदिनी हिच्या डाव्या हातावर मारुन जखमी केले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी दयानंद कोळी,विशेष कोळी, मंगल कोळी,सुप्रिया कोळी, जुई कोळी यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा अधिक तपास सहाय्य पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे व पोलीस हवालदार दत्तात्रय येलपले हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज