टीम मंगळवेढा टाईम्स।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे.
विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांची शनिवारी दुपारी बारा वाजता विद्यापीठात बैठक होणार आहे. या बैठकीत ६५ सिनेट सदस्य मतदान करतील. तीन जागांसाठी सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
व्यवस्थापन परिषदेच्या एकूण आठ जागांसाठी निवडणूक लागली असून यापैकी पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. पदवीधर, प्राचार्य, शिक्षक तसेच विद्यापीठ व्यवस्थापन अशा चार गटातून आठ जागांसाठी निवडणूक लागली होती.
पाच सदस्य बिनविरोध झाल्याने आता तीन जागांसाठी निवडणूक लागली आहे. पदवीधर गटातून चन्नबसप्पा बंकूर यांच्या विरोधात सचिन गायकवाड निवडणूक लढवीत आहेत.
शिक्षक मतदार संघातून डॉ. वीरभद्रे दंडे यांच्या विरोधात डॉ. समाधान पवार निवडणूक लढवीत आहेत.
प्राचार्य गटातून मंगळवेढा येथील श्री संत दामाजी महाविद्यालयाचे प्रा.निवृत्ती पवार यांच्या विरोधात डॉ.राजेंद्रकुमार शेंडगे निवडणूक लढवीत आहेत. एकूण ६४ सिनेट सदस्य या तीन जागांसाठी मतदान करतील.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज