टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातून एक संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अवघ्या ३ वर्षे २ महिने वयाच्या एका निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी अत्यंत तत्परता दाखवत एका १७ वर्षीय अल्पवयीन संशयित मुलाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड संताप आणि खळबळ उडाली आहे.

आजीने पाहिला प्रकार; पोलिसांत तात्काळ धाव
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेच्या आजीने हा धक्कादायक प्रकार स्वतः पाहिला. त्यांनी कोणताही वेळ न गमावता थेट पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि संशयित १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाला काही तासांतच ताब्यात घेतले.

पॉक्सो आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
पीडित चिमुरडीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या घटनेचे संपूर्ण स्वरूप अधिक स्पष्ट होईल.

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध खालील कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (Atrocity Act), विनयभंग आणि इतर संबंधित कलमे

पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये!
घटनेची संवेदनशीलता पाहता उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) डॉ. बसवराज शिवपुजे यांनी स्वतः या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. पॉक्सो कायद्यातील तरतुदीनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया अत्यंत कडकपणे राबवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशा घटना नराधमांच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडवणाऱ्या असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













