टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथील पक्षी बर्ड फ्लू सदृश रोगाने मरण पावल्याने हा परिसर नियंत्रित क्षेत्र तर मारापूर लगतच्या 10 किलोमीटर परिसर सतर्क भाग म्हणून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घोषित केला आहे.
तर भालेवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या 17 कोंबड्या मरण पावल्या आहेत.
कार्यक्षेत्रात जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी प्रभावी अंमलबजावणी करावी .संबंधित तालुक्यात पशुसंवर्धन विभागाने सर्व कुकुट फार्म,परिसरातील कुक्कुट पक्ष्यांची तपासणी करावी.
पक्षी मृत झाल्यास नियंत्रण कक्ष्याला(9822809064,9527769179)माहिती ध्यावी.कुक्कुट पालकांनी पक्षी मृत अथवा आजारी असल्यास तालुका पशुसंवर्धन अधिकारी (7083175999,9049394733)संपर्क करावा.
काय घ्याल दक्षता :-
एखाद्या ठिकाणी कोंबड्या किंवा मृत पक्षी आढळून आल्यास मृत पक्ष्याच्या संपर्कात अन्य पक्षी किंवा प्राणी येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
आजारी पक्ष्याची वाहतूक किंवा विक्री करू नये.
सतर्क क्षेत्रात जिवंत किंवा मृत पक्षी,अंडी,कोंबडी खत,पक्षी खाद्य,आणि उपकरणे यांची वाहतूक करू नये.
सतर्क क्षेत्रात 5 किलोमीटर परिसरात पक्ष्यांच्या आजाराचे निदान अहवाल प्राप्त होईपर्यंत कुक्कुट पक्ष्यांची खरेदी-विक्रीची दुकाने व वाहतूक बंद राहील.
सतर्क क्षेत्रातील पक्षी खरेदी-विक्रीसाठी कोणत्याही बाजारात नेता येणार नाही.
आवश्यकतेनुसार मृत पक्ष्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावण्यासाठी तीन फूट खोल खड्डा करून त्यामध्ये चुना पावडर टाकून पक्षी पुरण्याची प्रक्रिया पूर्वपरवानगीने करावी.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज