मंगळवेढा टाईम्स टीम ।
कोरोना महामारीमुळे संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या साखर वाटपास विलंब झाला असून गुढीपाडवा सणाची साखर उद्यापासून सभासद शेतकऱ्यांना मिळणार आहे.
संत दामाजी कारखान्याचे सभासदांना गुढीपाडवा २०२१ सणासाठी देण्यात येणारी प्रती शेअर्स ३० किलो साखर प्रति किलो १० रुपये या सवलतीचे दराने मंगळवार दि.८ जुन ते दि.१७ जून या कालावधीत खालील साखर वाटप केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत वाटप करण्यात येणार असलेची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी दिली.
साखर वाटप केंद्र ,गाव पुढीलप्रमाणे:-
कारखाना साईट – उचेठाण, बठाण, मुढवी, धर्मगांव , कारखाना गट ऑफिस नागणेवाडी – मंगळवेढा शहर, हॉटेल राजकिरण शॉपिंग सेंटर खोमनाळ नाका मंगळवेढा – हिवरगांव, फटेवाडी, खोमनाळ, डोंगरगांव, कचरेवाडी, अकोला, ढवळस, मल्लेवाडी, देगांव
माचणूर – रहाटेवाडी, तामदर्डी, माचणूर, ब्रम्हपूरी – ब्रम्हपूरी, मुुंढेवाडी, बोराळे – बोराळे , सिध्दापूर – सिध्दापूर, तांडोर , अरळी – अरळी , डोणज – डोणज, नंदूर , कागस्ट बालाजीनगर स्टॉप – बालाजीनगर, कागस्ट, कात्राळ, कर्जाळ, डिकसळ
मरवडे – मरवडे, तळसंगी, येड्राव, भालेवाडी, हुलजंती – सोड्डी, शिवणगी, पौट, येळगी, हुलजंती, भोसे – भोसे, शिरनांदगी, रडडे, नंदेश्वर – नंदेश्वर, गोणेवाडी, खडकी, जुनोनी, हुन्नूर – महमदाबाद, लोणार, पडोळकरवाडी, मानेवाडी, रेवेवाडी, हुन्नूर , पाटखळ – जालिहाळ, हाजापूर, खुपसंगी, शिरसी, पाटखळ, आंधळगांव – लेंडवे चिंचाळे, आंधळगांव, गणेशवाडी, शेलेवाडी, लक्ष्मी दहिवडी – लक्ष्मी दहिवडी, महमदाबाद, गुंजेगांव, घरनिकी – घरनिकी, मारापूर,
सलगर बु। – सलगर बु, लवंगी, सलगर खु।, आसबेवाडी, मारोळी, जंगलगी , निंबोणी – निंबोणी, खवे, जित्ती, बावची, चिक्कलगी, सिध्दनकेरी, भाळवणी
यावेळी कोरोना साथीमुळे गुढीपाडवा २०२१ ची साखर वाटप करण्यास विलंब होत आहे. तसेच जे सभासद वर नमूद मुदतीत आपली सभासद साखर त्यांचे वैयक्तीक अडचणीमुळे घेवू शकणार नाहीत.
त्यांनाही कारखाना साईटवर वरील मुदतीनंतरही त्यांची साखर देणेची व्यवस्था करीत आहोत. कोणताही सभासद साखरेपासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घेत आहोत.
तरी सर्व सभासदांनी वरील नमूद केलेल्या साखर वाटप केंद्रावर आवश्यक ते सुरक्षीततेचे नियमाचे पालन करुन वेळेवर साखर उचलण्याची व्यवस्था करुन कारखान्यास सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज