टीम मंगळवेढा टाईम्स।
बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला खून करण्यात आला. या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यावर आरोप केला जात आहे
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता. मात्र आज 22 दिवसांनंतर वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात शरण आला. आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही.
कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही. खंडणी मागता येणार नाही. यादृष्टीने अतिशय गतिशील तपास केलेला आहे. त्यामुळेच आज वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागली आहे.
आता हत्येतले जे आरोपी फरार आहेत, त्यांना पकडण्याकरता वेगवेगळ्या टीम्स कामी लागलेल्या आहेत. कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही, सगळ्यांना शोधून काढू, असे त्यांनी म्हटले.
फडणवीसांचे संतोष देशमुखांच्या भावाला आश्वासन
ते पुढे म्हणाले की, आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माजी फोनवर चर्चा झाली आहे. त्यांनाही मी आश्वासन दिले आहे की, तुम्ही काळजी करू नका.
काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फासावर लटकवत नाही, तोपर्यंत पोलीस कारवाई करतील, असेही त्यांनी म्हटले.
जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे
तर वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा दाखल होणार का? असे विचारले असता ते म्हणाले की, कोणता गुन्हा दाखल होईल? कसा होईल? याबाबत सगळी माहिती पोलीस देतील. ते पोलिसांचे काम आहे.
पुराव्यांच्या आधारावर कोणालाही सोडणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगत आहे. या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील. जाणीवपूर्वक ही केस सीआयडीकडे सोपवण्यात आली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कोणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज