टीम मंगळवेढा टाइम्स
मंगळवेढा तालुक्यातील बठाण, उचेठाण येथून अवैधपणे वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत, या संदर्भात दोन-चार आंदोलने, अनेक मोर्चे निघून देखील प्रशासन यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.
बठाण, उचेठाण येथून दिवस व रात्रभर 200 ते 250 वाळूचे टिपर भरून जातात यामध्ये जवळपास सर्वच वाहनांना पावती नसते, शिवाय प्रमाणापेक्षा जास्त वाळू उपसा देखील ठेकेदाराकडून होत आहे.
सर्वसामान्य जनतेने साधी याची विचारपूस केली तरी त्यांच्यावरती खोटे केसेस दाखल होण्याचे प्रमाण देखील आता समोर येऊ लागले आहेत, या दोन्ही वाळू उपसा ठेकेदारांकडून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले असल्याचे सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत.
यावर वेळीच अंकुश नाही ठेवला तर येणाऱ्या काळात मोठी घटना घडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे? या घटनेला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असणार आहे असा थेट इशारा सर्वसामान्य नागरिकांनी दिला आहे.
बठाण, उचेठाण येथील वाळू ठेकेदारांनी पुन्हा बिगर पावतीची वाहन सुरू केली; ‘ही‘ संघटना अर्धनग्न आंदोलन सुरू करणार
मंगळवेढा तालुक्यातील बठाण, उचेठाण येथील वाळू ठेकेदारांनी पुन्हा बिगर पावतीचे वाहन सुरू केली आहेत. प्रहारचे आसुड आंदोलन होते तोपर्यंत या वाळु ठेकेदारांना टेंशन आले होते व वाहने बिगर पावतीचे बंद होती पुन्हा सुरू झाली आहेत.
परंतु हे अधिकारी जाणून-बुजून दुर्लक्ष का करीत आहेत. दररोज अनेक वाहने भरून जात आहेत. ओव्हरलोड वाहने सुद्धा आरटीओ अडवत नाही त्यामुळे महसूल प्रशासनाचे अधिकारी कधी जागे होणार आहेत.
प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी या भागाकडे का फिरत नाहीत. दिवसभर वाहने सुरू असतात एक ही वाहन अडवले जात नाही हे एकही अधिकारी तिकडे फिरकत नाही जर कोणी वाहने अडविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना धमकी दिली जाते यावर आता प्रहार संघटना आवाज उठवणार आहे.
महसूल प्रशासन हा ठेका बंद करावा असे जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी करणार आहे जोपर्यंत हा ठेका रद्द होत नाही तोपर्यंत प्रहार संघटनेचे अर्ध नग्न आंदोलन सुरूच ठेवणार आहे.
सोबत प्रहार चे समाधान हेंबाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील, रोहिदास कांबळे, युवराज टेकाळे, शकील खाटीक, आनंद गुंगे, आप्पा गोरे यांना सोबत घेऊन मी अर्धनग्न आंदोलन सुरू करणार आहे.
ज्या दिवशी ठेका बंद होईल त्याच दिवशी माझे आंदोलन संपेल असा इशारा प्रहारने दिला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज