मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यातील लाडकी बहीण योजनेची स्क्रुटीनी आता राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली असून ज्या अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे, त्या लाडक्या बहिणींकडे मिळालेले पैसे परत घेतले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
त्यातच, महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे संभ्रम निर्माण झाला होता. काही महिला स्वत:हून पैसे करत आहेत, त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा होतील असेही आदिती यांनी म्हटले होते.
त्यामुळे, लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, सरकारकडून पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचंही सांगण्यात येत होतं. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट शब्दात शासनाची भूमिका मांडली.
लाडक्या बहिणींकडून कुठलीही रिकव्हरी होणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, राज्यातील सर्वच लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकावर टीकेची झोड उठली.
आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याकडूनही आदिती तटकरे व राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती. तसेच, लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले तर गाठ आमच्याशी असे म्हणत इशाराही दिला होता.
आता, याबाबत स्वत: आदिती तटकरे यांनीही पैसे परत घेणार नसल्याचे म्हटलं आहे. आम्ही शासन म्हणून कोणाचेही पैसे परत घेतलेले नाहीत. विभागाने किंवा सरकारने गेल्या पाच महिन्यातले पैसे परत घेण्याचा प्रश्नच येत नाही कारण आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. तर, अजित पवार यांनीही स्पष्ट शब्दात सांगितलंय.
पैशाची रिकव्हरी करणार नाही
लाडकी बहीण योजनेचा लाभ खरोखरी पात्र असलेल्या व आवश्यक असलेल्या महिलांनाच मिळाला पाहिजे. मात्र, या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळाला आहे, त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. लाडक्या बहिणींकडून पैशाची रकव्हरी करणार नाही, असे एका वाक्यात उत्तर अजित पवारांनी दिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज