बाळासाहेब झिंजुरटे । अति मद्य प्राशन केल्याने रक्ताची उलटी होऊन उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केलेल्या जावयाचा सासरी मृत्यू झाला.शनिवारी ७ वाजण्याच्या दरम्यान सांगोला तालुक्यात राजुरी येथे हा प्रकार घडला. Death in Sasurwadi due to alcoholism
प्रकाश राजाराम पाटील ( वय २६ , रा . जालिहाळ खुर्द , ता.जत , जिल्हा सांगली ) असे मृत जावयाचे नाव असून त्याच्या नातेवाईकांनी मात्र घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. प्रकाश पाटील हा काही दिवसांपूर्वी सांगोल्यात सासुरवाडी राजुरी येथे आला होता.
दरम्यान ,पत्नी लक्ष्मी पाटील ऑक्टोबर २०१९ मध्ये प्रसूतीसाठी माहेरी आली होती. एप्रिल २०२० मध्ये ती प्रसूत झाली. भावाचे लग्न असल्याने ती माहेरीच थांबली होती. दारूने व्यसन असल्याने प्रकाश पाटील दोन दिवसांपासून अति मद्य प्राशन करीत होता. रविवारी त्याला रक्ताची उलटी झाली.
मेहुणे मारुती दबडे व सासू रंजना मनोहर दबडे या दोघांनी जावई प्रकाश पाटील यास गावातील डॉ. दबडे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याबाबत पत्नी लक्ष्मी पाटील हिने सांगोला पोलिसात खबर दिली.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज