टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोनाचा प्रादुर्भाव सोलापूर शहरात व ग्रामीण भागात वाढत असताना चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना योद्धे, राजकीय नेते, प्रशासन सगळेच या लढाईत मैदानात उतरत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाबतच्या कामांचा आढावा घेण्यासाठी व त्याची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज सोलापुरात येत आहेत. Sharad Pawar in Solapur
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. विशेषतः शहरात संक्रमित रुग्णांची आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. प्रशासनाकडून अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत.त्याचा एक भाग म्हणून सोलापूर शहर व परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तरीही संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार शरद पवार आज सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.
शरद पवार या वेळी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून कोरोनाची समस्या आणि उपाय योजना जाणून घेणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येण्यासाठी कोणत्या उपाय योजना सुचवितात. तसेच महाराष्ट्र सरकारच्या मदतीसोबतच केंद्र सरकारची काही मदत सोलापूरला देण्यासाठी पवार काही निर्णय घेतात का? याकडे सोलापूरचे लक्ष लागले आहे.
आतापर्यंत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात येऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे दर आठवड्याला सोलापुरात असतात.
सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचा दौरा करावा, अशी विनंती पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केली होती. ती विनंती मान्य करून शरद पवार दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री भरणे यांनी पवार यांना सोलापूरच्या लॉकडाउनबाबत कल्पना दिली होती.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज