टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकामाचे जॉब कार्ड व हजेरीपट देण्यासाठी एक हजाराची लाच मागून 200 रुपये घेताना माळशिरस पंचायत समितीतील डाटा एन्ट्री ऑपरेटर व रोजगार सेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
अभिजीत भारत गिरीगोसावी, वय २४, पद- डाटा एन्ट्री ऑपरेटर, (कंत्राटी) माळशिरस पंचायत समिती कार्यालय, माळशिरस रा. पंढरपूर
सर्जेराव बाबुराव लोखंडे, वय- ४५ पद- रोजगार सेवक, (रोजगार हमी योजना) मारकडवाडी ग्रामपंचायत, ता. माळशिरस, जि. सोलापूर या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
यातील तक्रारदार यांना रमाई घरकुल योजनेच्या अंतर्गत घरकुल मंजुर झाले असून बांधकामाचे जॉबकार्ड व हजेरीपट देण्यासाठी माळशिरस पंचायत समिती कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटर अभिजीत भारत गिरीगोसावी यांनी
प्रत्येक हजेरीपटास २०० रू. याप्रमाणे १००० रू. लाचेची मागणी करीत असलेबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर या कार्यालयाकडे दि.९ जून २०२२ रोजी तक्रार प्राप्त झाली होती.
सदर तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता यातील अभिजीत भारत गिरीगोसावी यांनी घरकुल योजनेच्या झालेल्या कामाच्या तिसऱ्या हजेरीपटाकरीता २०० रू. लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम
सर्जेराव बाबुराव लोखंडे पद-रोजगार सेवक यांच्याकडे देण्यास सांगितले. सर्जेराव बाबुराव लोखंडे यांनी सदर लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर येथील पथकाने रंगेहात पकडले आहे.
सदर प्रकरणात दोन्ही आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
ही कारवाई चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर, पोलीस अंमलदार पोना प्रमोद पकाले, पोकों उमेश पवार, पोकों गजानन किणगी, चापोकों शाम सुरवसे, यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज