mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय अभिनेत्री रिंकू राजगुरू येणार; वॉटरप्रूफ मंडप, साउंड, निवास, भोजन व्यवस्था चोख

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 8, 2022
in मंगळवेढा, मनोरंजन, राज्य, शैक्षणिक, सोलापूर
सैराट फेम रिंकू राजगुरू ब्रिटनमध्ये अडकली, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लॉकडाऊनचा फटका

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा अठरावा युवा महोत्सव दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय, मंगळवेढा येथे होणार असून

उद्या रविवार ९ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

उद्या रविवारी सकाळी दहा वाजता पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन सोहळा होणार आहे.

बघा काय म्हणते आर्ची;-

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/10/919890779917_status_5e33b5c0691d4ccca0d784082bbe56d9.mp4

रविवारी सायंकाळी सहा वाजता एकांकिका रंगमंचाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते होईल. ९ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नृत्य, नाट्य, ललित, वांग्मय, संगीत विभागातील एकूण २९ कलाप्रकारांचे सादरीकरण या युवा महोत्सवात होणार आहे.

सुमारे ७५ महाविद्यालये आणि जवळपास दोन हजार विद्यार्थी, कलाकारांचा यामध्ये सहभाग राहणार आहे. युवा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवार, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत नोंदणी,

उद्घाटन सोहळा, संघ व्यवस्थापनकांची बैठक, मूकनाट्य, समूहगीत, कातरकाम, प्रश्नमंजुषा लेखी, मराठी-हिंदीइंग्रजी वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, भितीचित्रण, रांगोळी आणि एकांकिकेचे सादरीकरण होणार आहे.

सोमवार दि.१० ऑक्टोबर रोजी शास्त्रीय नृत्य, सुगम गायन, पथनाट्य, स्थळचित्रण, वादविवाद, फोक आर्केस्ट्रा, शास्त्रीय सुरवाद्य, कथाकथन, मिमिक्री, स्पॉट फोटोग्राफी, एकांकिका (मराठी, हिंदी) आदी स्पर्धा पार पडतील.

मंगळवार दि.११ ऑक्टोबर रोजी प्रश्नमंजुषा तोंडी, निर्मिती चित्र, शास्त्रीय गायन, व्यंगचित्रण, लघुनाटिका, शास्त्रीय तालवाद्य, मातीकाम आणि लोकनृत्याच्या स्पर्धा रंगतील.

बुधवार दि.१२ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ वाजता शोभायात्रा पार पडल्यानंतर सकाळी अकरा वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जाणार आहेत.

वॉटरप्रूफ मंडप, साउंड, निवास, भोजन व्यवस्था चोख

यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमान दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.

महाविद्यालयाचे अध्यक्ष अँड. सुजित कदम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी, परीक्षक, मान्यवर यांच्या भोजन, निवास आदी व्यवस्थेचे चोख नियोजन करण्यात आले आहे.

महत्त्वाचे म्हणजे मुख्य रंगमंच आणि इतर स्पर्धेसाठी चार ते पाच मोठे रंगमंच संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप मारून तयार करण्यात आले आहे.

कलाप्रकार सादरीकरणासाठी उत्तम साऊंड व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी कलाकारांना कोणतीच अडचण भासणार नसल्याचा विश्वास विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.केदारनाथ कळवणे यांनी व्यक्त केला आहे.(स्रोत:लोकमत)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रिंकू राजगुरू

संबंधित बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! काळ्या आईची सेवा करतानाच काळाची झडप; मंगळवेढ्यात सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

September 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
Next Post
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

मंगळवेढ्यात शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उद्या मुळव्याध-भगंदर व बालरोग तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 26, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..