मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
हगलूर (ता. उत्तर सोलापूर) येथील राणी मोहन जाधव यांच्या घरी सहकार विभागाने टाकलेल्या धाडीत अवैध सावकारीशी निगडित करार, बॉण्ड व हिशेबाच्या डायऱ्या आढळून आल्या आहेत.
उत्तर सोलापूर सहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक प्रिया राजेंद्र संकद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राणी जाधव यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ त्याखालील नियम २०१४ प्रमाणे अवैध सावकारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थ दशरथ शिंदे (रा. हगलूर, ता. उत्तर सोलापूर) यांच्या अर्जावरून जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड व उत्तर सोलापूरचे सहाय्यक निबंधक दत्तात्रय भवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
काल सकाळी ७.३० वाजता पथक प्रमुख पी. आर. संकद, ए. एस. पुजारी, व्ही. जे. गौड, एस. बी. कासार, पंच क्र. १ रामदास मादगुंडी, एन. एन. बल्ला, पोलिस हेड कॉन्स्टेबल रहीम इलाही सय्यद, महिला पोलिस कॉन्स्टेबल कविता वंजारी या पथकाने जाधव यांच्या घराची झाडाझडती घेतली.
यात जाधव यांच्या घरातील लोखंडी कपाटात एका छोट्या डायरीत स्टॉकिस्ट प्रगती एजन्सीज ६६६, फलटण गल्ली, सोलापूर यामध्ये सुरुवातीच्या दोन पानांवर रक्कम व
दिनांक व्याज, महिने असे नमूद आहे. राजश्री सिमेंटची छोटी डायरी ज्यामध्ये सुरुवातीच्या पहिल्या पानावर दिनांक विरहित व्याज, मुद्दल व रक्कम अशा ७ नोंदी नमूद आहेत.
५०चे दोन स्टॅम्पवरील करारनामेही सापडले आहेत. राणी मोहन जाधव (रा. हगलूर, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज