टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढ्याची ज्वारी, सांगोल्याचे डाळिंब देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी सांगोला-मंगळवेढा सोलापूर असा नवीन रेल्वे मार्ग तयार करावा
व त्या नवीन रेल्वे मार्गाचे सर्व्हेक्षण करण्यास त्वरित मंजुरी द्यावी. अशी मागणी खा.डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केली.
लोकसभेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते सोलापूर हे अंतर सुमारे ८५ किलोमीटर आहे.
सोलापूर ते सांगोला हा फक्त रस्ता उपलब्ध आहे. सांगोल्यासह जिल्ह्यात चांगल्या प्रतीचे डाळिंबाचे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते. सांगोल्यातील डाळिंबाची परदेशातही निर्यात होते. यासोबतच मंगळवेढ्याच्या ज्वारीला देशभरात मागणी आहे.
शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी रेल्वे किफायतशीर
विशेषतः शेतकऱ्यांना शहराच्या बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाच्या दृष्टीने रेल्वे हे अत्यंत किफायतशीर वाहतुकीचे साधन आहे.
त्यामुळे सांगोला-मंगळवेढा-सोलापूर रेल्वे मार्ग सुरू झाल्यास सांगोला व मंगळवेढा येथील शेतकऱ्यांना आपला माल सोलापूरलाच नव्हे तर देशातील इतर
शहरातही पाठविण्याची सुविधा मिळू शकेल.
सांगोला व मंगळवेढा येथील अनेक शेतकरी व व्यावसायिकांनी ही रेल्वेसेवा सुरू करावी, अशा मागण्यांचे निवेदन यापूर्वी दिले आहे.
मंगळवेढा येथील आमदार समाधान आवताडे, लोकप्रतिनिधींनीही रेल्वे मंत्रालयाला याबाबत मागणीचे निवेदन दिले आहे.
सांगोला- मंगळवेढा-सोलापूर या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाबाबत मंगळवेढा सांगोला व सोलापूरचे लोकप्रतिनिधी व रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून सांगोला-मंगळवेढा-सोलापूर रेल्वे मार्गाला मंजुरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज