मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा राजीनामा देऊ नये म्हणून देगावचे नागरिक रस्त्यावर उतरले. यावेळी राजीनामा देऊ नये, असा आग्रह धरला.देगाव (ता.पंढरपूर) येथील सरपंच सीमा घाडगे यांच्या समर्थनात लोक रस्त्यावर उतरले होते.
देगाव ग्रामपंचायतीमधील सरपंच सीमा घाडगे यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्या राजीनामा देण्याच्या तयारीत असतानाच महिला, बाल, वृद्धांसह नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतला.
प्रत्येक जण रखरखत्या उन्हामध्ये ‘ह्योच सरपंच पाहिजे’ अशा घोषणा देत ग्रामपंचायत परिसर दणाणून सोडला.
सीमा घाडगे यांनी सरपंचपदाच्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या आहेत.
सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामपंचायत समोर ठाण मांडून बसलेले गावातील नागरिक, महिला, बालक व वृद्ध यांनी सरपंचांनी राजीनामा देऊ नये, यासाठी आग्रह धरला.
याच वेळेस एका तरुणाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रकाराने वातावरण तापले होते. गावातील सर्व नागरिकांनी एकोपा करत ‘ह्योच सरपंच पाहिजे’ यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
शेवटी सरपंचांनी सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेऊ, असे घोषित केल्यानंतर दुपारी दोन वाजता हे ठिय्या आंदोलन संपले.
विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावून दिली
गावातील लहान मुले हे देशाचे भविष्य घडविणारे असून, त्यांच्या शिक्षणासाठी गावांमध्ये दररोज संध्याकाळी दोन तास मोबाइल बंद उपक्रम राज्यात पहिल्यांदा राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण करून दिली.
आज तेच विद्यार्थी डोळ्यात अश्रू आणत आमच्या भविष्याचा विचार करणारा तसेच आम्हाला शाळेपर्यंत येताना कोणतीही अडचण भासू न देता विकास करणाऱ्या विकासात्मक सरपंचांना कायम पदावर ठेवावे यासाठी रस्त्यावर उतरले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज