mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाला आजपासून शुभारंभ; महसूल विभागाच्या योजना आता शेतकऱ्यांच्या बांधावर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 7, 2026
in मंगळवेढा
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

टीम मंगळवेढा टाइम्स ।

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत असून मंगळवेढा तालुक्यात आज दि.7 मार्च पासून या अभियानाचा शुभारंभ होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ जनतेला एकाच छताखाली मिळावा व या निमित्ताने महसूल यंत्रणा प्रत्येक गावापर्यंत पोहचावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येत आहे.

मंगळवेढा तालुक्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, प्रांताधिकारी बी.आर.माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळवेढा व बोराळे मंडळासाठी जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा याठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात येणार आहे.

त्याचबरोबर दिनांक 14 मार्च रोजी जिल्हा परिषद शाळा आंधळगाव, 10 एप्रिल रोजी सिध्दनाथ मंगल कार्यालय पाटखळ, 17 एप्रिल रोजी हनुमान विद्यालय मरवडे, 8 मे रोजी जिल्हा परिषद शाळा भोसे व 15 मे रोजी नगर परिषद शाळा क्रमांक 2 मंगळवेढा येथे  हे शिबीर राबविण्यात येणार आहे.

या शिबिरामध्ये प्रामुख्याने प्रलंबित फेरफार विषयक कामकाज, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8 अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीच्या दाखल्यांचे वितरण, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र,

अकृषक परवानगी व नवीन तरतुदीबद्दल मार्गदर्शन, नवीन अकृषक तरतुदीनुसार सनद प्रक्रिया बाबत मार्गदर्शन, संजय गांधी योजना विभागामार्फत सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या प्रकरणांचा निपटारा,

पाणंद रस्त्यांच्या बद्दल कार्यवाही, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्री स्टॅक आणि पीएम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रक तयार करणे, पुरवठा विभाग विषयक कामकाज,

घरकुल लाभार्थ्यांसाठी मोफत वाळू वाटप व महसूल विभागाच्या वतीने दिला जाणाऱ्या सर्व सेवांचा लाभ नागरिकांना या शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली घेता येणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील शिबिरांचा शुभारंभ आमदार समाधान आवताडे यांच्या शुभ हस्ते शनिवार दिनांक 7 मार्च रोजी होणार असून या कार्यक्रमास सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच प्रांताधिकारी बी.आर.माळी व इतर विभागाचे सर्व अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

‘महसूलची वारी, शेतकऱ्यांच्या दारी’ हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा लाभ तालुक्यातील सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला असे सर्वांनी घ्यावा असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा तहसीलदार

संबंधित बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

July 27, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

मंगळवेढ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! सारा अबॅकस’च्या विद्यार्थ्यांचे ‘नॅशनल समर कॉम्पिटिशन’मध्ये देदीप्यमान यश; अवघ्या ६ मिनिटांत १०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी दाखवली चुणूक

July 24, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

तरुणांनो..! बसस्थानक अन् कॉलेज परिसरात विनाकारण फिरताय? सावध व्हा; मंगळवेढ्यात १३ ‘रोड रोमिओ’ पोलिसांच्या जाळ्यात

July 24, 2026
Next Post
मेजवानी! मरवडे फेस्टिव्हलचे सोमवारपासून आयोजन; कलावंतांच्या आविष्कारासह शोभायात्रेचे आयोजन; शेकडो कलावंत सहभागी होणार

सज्ज व्हा! मरवडे फेस्टिव्हलचा आजपासून शुभारंभ, पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि प्रबोधनाची वारी

ताज्या बातम्या

धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..