टीम मंगळवेढा टाईम्स ।
दारू पिण्यासाठी पैसे दे नाही तर तुला मारून टाकतो , अशी धमकी जन्मदात्या आईस देत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे आईस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.
ही घटना मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथे असून फिर्यादी मुक्ताबाई युवराज इंगळे (वय ४५) यांनी दिली आहे. मुलगा बाळू इंगळे याच्या विरोधात मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी बाळू इंगळे यास दारूचे व्यसन आहे. वडील युवराज इंगळे हे कामानिमित्त सांगोल्याला गेले होते. आई मुक्ताबाई इंगळे या स्वयंपाक करत असताना बाळू इंगळे हा दारूसाठी पैसे मागितल्यानंतर आईने नकार देताच
तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीत त्यात आईचे तीन दात पडून रक्तस्त्राव सुरू झाला. आणखी मारहाणीच्या भीतीपोटी त्यानी दोनशे रुपये देऊन स्वतःला घरात कोंडून घेतले.
त्यावेळी नातवाने शेजारच्या लता इंगळे याना बोलावले. तेव्हा बाळू हा शिवागाळ करत बाहेर गेल्यानंतर शेजाऱ्यानी फिर्यादीला घरातून बाहेर काढू उपचार व फिर्याद दाखल करण्यास नेले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज