mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची सही; राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 24, 2021
in राज्य
ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची सही; राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे.

त्यामुळे आगामी महानगरपालिका, नगर पालिका, पंचायत समित्या, नगर पंचायती, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काय आहे अध्यादेश?

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यातील ओबीसींचं राजकीय आरक्षण बंद झालं होतं. यावरून बराच राजकीय गदारोळ झाला होता.

राज्य सरकारनं ओबीसींनी आरक्षण देण्यापूर्वी त्रिसुत्रीचं पालन करावं आणि ओबीसींचा इम्पिरिकल डाटा कोर्टात सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसींना आरक्षण देण्याची योजना आखली होती.

सुधारणेनंतर सही राज्य सरकारने हा अध्यादेश यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सहीसाठी पाठवला होता. मात्र राज्यपालांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या.

ओबीसींना आरक्षण देताना एकूण आरक्षणाचे प्रमाण हे 50 टक्क्यांच्या वर जाणार नाही, अशी तरतूद या अध्यादेशात करण्याची सूचना राज्यपालांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ही सुधारण करत अध्यादेश पुन्हा राज्यपालांकडे पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांनी सही केली आहे.

काँग्रेस नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, चर्चांना उधाण तज्ज्ञांकडून शंका आगामी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात हा अध्यादेश मांडला जाईल आणि त्याचं कायद्यात रुपांतर होईल.

मात्र हा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकेल का, अशी शंका ओबीसी आरक्षणाचे अभ्यासक डॉ. हरी नरके यांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्रिसुत्रीचं पालन करण्याचे आदेश दिले होते.

त्यातील इम्पिरिकल सर्व्हे करून इम्पिरिकल डेटा सादर करण्याच्या सूचना होत्या. या सूचनांची अंमलबजावणी न करताच जर हा अध्यादेश काढला असेल, तर सर्वोच्च न्यायालयात कसा टिकणार, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

मात्र सध्या तरी राज्य सरकारनं या अध्यादेशाद्वारे ओबीसींना राजकीय आरक्षण लागू केलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भगतसिंग कोशयारी

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे इफेक्ट! मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निर्णय, शासकीय यंत्रणा लागली कामाला; ‘हा’ हेल्पलाइन नंबरही जारी

June 5, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

आता खेळ खल्लास! भेसळखोरांविरोधात तुकाराम मुंढे आक्रमक; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

June 5, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

शेतकऱ्यांनो! आधी ‘ही’ रक्कम बँकेत भरावी लागणार; मगच मिळणार कर्जमाफी व नवीन पीककर्ज

June 5, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

धक्कादायक! स्त्री रोगतज्ञ डॉक्टर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात; 4500 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं

June 4, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

मालक, आता निर्णय घ्या! परिचारक समर्थकांचा भाजपला थेट इशारा, बंडखोरी की पेल्यातील वादळ? पक्षाने शब्द पाळला नाही; प्रशांत परिचारकांकडून मात्र ‘सबुरी’चा सल्ला

June 4, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

June 2, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

कामाची बातमी! व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका अन् धोका, तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं; सायबर पोलिसांकडून महत्त्वाचं आवाहन

June 1, 2026
Next Post

ओबीसी आरक्षण अध्यादेशावर राज्यपालांची सही; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा शरद कोळीकडून सत्कार

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

जनगणनेच्या कर्तव्यावर निघालेल्या ‘आदर्श शिक्षका’चा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू; कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ हरपला

June 7, 2026
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराकडून गावोगावी बैठकांचे सत्र सुरू; विधानसभेसाठी मोर्चेबांधणी की…; कार्यकर्त्यांकडून असा आग्रह

दोन पावले मागे, की मोठ्या झेपची तयारी? समर्थक निराश, जाणकार खूश; प्रशांत परिचारकांच्या शांत भूमिकेमागे दडलंय काय?

June 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळेची भीती संपणार! सोलापूर जिल्ह्यात ‘या’ शाळेतच अंगणवाडी भरणार; बालवयात शाळेची गोडी लागणार; ग्रामीण शिक्षणाला मिळणार नवी दिशा

June 6, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026

मराठा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; ओबीसींप्रमाणे ‘या’ 8 सवलती लागू; जीआर देखील निघाला

June 6, 2026
मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

मंगळवेढ्यात आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय! ‘नूतन महिला अर्बन’चा आज दिमाखदार शुभारंभ; महिला सक्षमीकरणासाठी विविध योजनांची मेजवानी

June 6, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा