टीम मंगळवेढा टाईम्स ।
तु आमच्या विरोधातील कागदपत्र ऑफिसला घेवून येतो काय ? असे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक यांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धकमी दिल्या प्रकरणी
गोपीनाथ रामचंद्र माळी (रा. सराफ गल्ली), विष्णूदास बंसीलाल मर्दा (रा.मारवाडी गल्ली), इमाम हुसेन कोकणे (रा.दत्तू गल्ली), महेश रामचंद्र गवळी (रा.मित्रनगर) या चौघा विरुध्द अनुजाती जमाती कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी दत्तात्रय चंद्रकांत कांबळे (रा.डोणज) हे मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे निरीक्षक म्हणून काम करीत आहेत.
कृषी उत्पन बाजार समितीचे गाळा व प्लॉटच्या संदर्भातील कायदेशीर कामे असतील ते फिर्यादी करत आहेत. वरील आरोपी हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे गाळेधारक असून यांच्या विरुध्द गाळे भाडे मान्य नसले कारणाने
त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या विरोधात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा यांच्याकडे अपिल दाखल केले आहे. त्या अपिलाची सुनावणी करिता फिर्यादी हे सर्व कागदपत्रे घेवून व बाजार समितीचे सचीव सजिन देशमुख असे दोघे जातात.
दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता नमुद प्रकरणाची सुनावणी असल्याने ते दोघे कागदपत्रे घेवून निबंधक कार्यालय येथे दुपारी १२.१५ वाजता गेले होते.
सुनावणी झाल्यानंतर फिर्यादी व सचिव सचिन देशमुख हे ऑफिसच्या बाहेर आल्यावर वरील आरोपींनी तु आमच्या विरोधातील कागदपत्र ऑफिसला घेवून येतो काय? असे म्हणून शिवीगाळी, दमदाटी करुन तुला लय मस्ती आली आहे काय? असे म्हणत तु नोकरी करायच्या लायकीचा नाही, तु मंगळवेढ्यात कसा राहतो ?
आम्ही बघून घेतो असे म्हणत दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची दिलेल्या फिर्यादीत कांबळे यांनी म्हटले आहे. याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज