mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उमेदवारांनो सावधान! True Voter App वर दैनंदिन खर्च न भरल्यास आयोगाची होणार कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 11, 2021
in राजकारण
आजपासून आचारसंहिता लागू; ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, तारखा जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना “ट्रु व्होटर ऍप’ डाउनलोड करणे आणि त्यात माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक पारदर्शीपणे पार पडावी, यासाठी निवडणूक आयोगाने हे आदेश जारी केले आहेत.

उमेदवारांनी माहिती आणि दैनंदिन खर्च दररोज या ऍपमध्ये ऑनलाइन भरावयाचा आहे. निवडणुकीच्या प्रचारास केवळ चार दिवस राहिले असताना निवडणूक आयोगाने घातलेल्या बंधनामुळे उमेदवारांना वेळेचे नियोजन करावे लागणार आहे.

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहितेचे पालन करावे लागणार आहे.

त्यासाठी आवश्‍यक ती माहिती वेळोवेळी निवडणूक यंत्रणेकडे द्यावी लागणार आहे. उमेदवारांनी लेखी माहिती देण्याबरोबर आता ऑनलाइनही माहिती देण्यासाठीचे बंधन त्यांच्यावर घालण्यात आले आहे.

त्यानुसार आता ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना ट्रु व्होटर ऍप डाउनलोड करावे लागणार आहे. त्याद्वारे त्यांना आवश्‍यक ती माहिती व दैनंदिन खर्च त्यावर अपलोड करून बंधनकारक करण्यात आले आहे.

त्याचबरोबर ते लेखी स्वरूपातही निवडणूक यंत्रणेकडे द्यायचा आहे. निवडणूक आयोगाने त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत उमेदवारांना सूचना देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

निवडणुकीच्या प्रचारास केवळ चारच दिवस राहिले आहेत. त्यामुळे मतदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यापर्यंत चिन्हे पोचवताना उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यातच निवडणूक आयोगाने ऑनलाइन माहिती भरण्याच्या घातलेल्या बंधनामुळे उमेदवारांना वेळेचे नियोजन करावे लागणार आहे.

मतदान बुथचेही मॅपिंग

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी बूथ तयार करण्यात आले आहे. मतदारांच्या संख्येनुसार त्यांची रचना करण्यात आली आहे. संबंधित ऍप निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदारांनाही डाउनलोड करावे लगणार आहे.

त्या ऍपमध्ये संबंधित मतदान बूथचे मॅपिंग केले जाणार आहे. त्यात मतदान बूथचे आक्षांश, रेखांशही येणार आहेत. त्यामुळे त्याची माहितीही निवडणूक आयोगालाही त्याच वेळी कळणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक पारदर्शीपणे पार पडावी, यासाठी ही कार्यवाही करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्ले स्टाेअरवर जाऊन “ट्रु व्होटर ऍप’ हे ऍप डाउनलोड करावे, अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्यामध्ये आवश्‍यक ती माहिती भरून दैनंदिन खर्चही दररोज अपलोड करावयाचा आहे.-अमरदीप वाकडे, निवडणूक अधिकारी,

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामपंचायतनिवडणूक

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
Next Post
Breaking! सोलापूर ग्रामीणची राष्ट्रवादी युवकची कार्यकारिणी बरखास्त

मंगळवेढा ब्रेकिंग! इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा