mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विकासाची दूरदृष्टी! तीन वर्षात पाणी प्रश्न शंभर टक्के सोडवल्याने तालुक्यातील शेती सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला; आ.आवताडे यांनी दिलेले वचन केले पुर्ण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 11, 2024
in मंगळवेढा
विकासाची दूरदृष्टी! तीन वर्षात पाणी प्रश्न शंभर टक्के सोडवल्याने तालुक्यातील शेती सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला; आ.आवताडे यांनी दिलेले वचन केले पुर्ण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

यापूर्वीच्या निवडणुका पाणी प्रश्नावर झाल्या. आमदार झाल्यापासून तीन वर्षात पाणी प्रश्न शंभर टक्के सोडवल्याने तालुक्यातील शेती सिंचनाच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला आहे.

केवळ ३ वर्षात तीन हजार कोटीहून अधिक निधी मतदारसंघाच्या विकासासाठी खेचून आणला आहे. मतदार संघामध्ये एमआयडीसी आणल्याने तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

उर्वरित विकास कामे पूर्ण करण्यासाठी मला आणखी एकदा आपल्या आशीर्वादाच्या रूपाने संधी द्या असे आवाहन भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान केले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूकीसाठी आ आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील अकोला, शेलेवाडी, गणेशवाडी, खुपसंगी, जुनोनी  शिरसी, लेंडवे चिंचाळे या गावांचा प्रचार दौरा करून ग्रामस्थांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला.

पुढे बोलताना आमदार आवताडे म्हणाले की, सध्याच्या राजकारणात विरोधकांकडून कुटीचे डाव टाकून विकासाच्या अनुषंगाने जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. पण त्यांच्या बिनबुडाच्या आणि तथ्यहीन टीकेला मी उत्तर देत न बसता माझ्या कामातून व विकास कार्यातून मी आपणा सर्वांच्या समोर मतदारसंघाला विकासाचे रोल मॉडेल तयार करून दाखवीन असे म्हटले आहे.

मतदार संघातील युवकांची बेरोजगारी संपुष्टात आणून व्यावसायिक दृष्टिकोनातून उद्योगधंदे उभारणे व मतदार संघाला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेण्याची माझी जिद्द असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माझ्या आमदारकी कालखंडात मतदार संघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधत असताना कोणत्याही प्रकारचे राजकारण आड न आणता सर्व समावेशक समाजकारण करण्याच्या दृष्टीने मी निधीचा डोंगर उभा केला आहे

त्यामुळे विकास निधीचा हिशोब मागणाऱ्यांना या निवडणुकीमध्ये जनताच धडा शिकवून दाखवून त्यांची केविलवाणी राजकीय प्रगल्भता असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

सदरप्रचार दौऱ्यादरम्यान विविध गावातील महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या राजकीय नेतृत्वावर विश्वास ठेवून व महायुतीचे सरकारच्या कामाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करून आमदार समाधान आवताडे यांना या निवडणुकीमध्ये आपला पाठिंबा दर्शवला आहे. नवप्रवेशित सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आवताडे यांनी स्वागत करून पक्षामध्ये त्यांना योग्य ती सन्मानाची वागणूक दिली जाईल असे सांगितले.

यावेळी भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, शिवसेना अध्यक्ष अशोक चौंडे, माजी संचालक सुरेश भाकरे, राजन पाटील, भुजंगराव आसबे, विजय माने, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय जमदाडे,

भाजपा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, कृषिभूषण अंकुश पडवळे, शहराध्यक्ष नागेश डोंगरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव आदी मान्यवर तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ व नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजकीय जोडे बाजूला ठेवून समाधान दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा

२० पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. तालुक्यातील शेतीच्या व पिण्याचा पाण्याचा प्रश्न समाधान दादांनी सोडवला आहे. विकासाची ही मालिका अखंडपणे सुरु ठेवण्यासाठी आणि आपल्या पुढील पिढ्यांच्या सर्वांगीण उज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून समाधान दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे ही आजची गरज आहे – हिंमत अशोक पाटील- प्रगतशील बागायतदार, लेंडवे चिंचाळे

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: समाधान आवताडे

संबंधित बातम्या

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

महाशिवरात्री! माचणूरची सिध्देश्वर यात्रा आजपासून सुरू; पाच दिवसीय यात्रेत भाविकांना विविध उपक्रमांची पर्वणी; भाविकांची मोठी गर्दी

​हर हर महादेव! माचणूरच्या सिद्धेश्वर यात्रेचा आजपासून शंखनाद; पाच दिवस भक्ती आणि उत्साहाचा जागर, विविध उपक्रमांची पर्वणी; भाविकांची मोठी गर्दी

February 15, 2026
हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप

February 14, 2026

खळबळ! हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात डल्ला मारणारा मंगळवेढ्याचा व्यावसायिक गजाआड; सव्वाआठ लाखांचे दागिने जप्त

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 15, 2026
Next Post
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

अडचणी वाढल्या! भगीरथ भालकेंना मंगळवेढ्यानंतर पंढरपुरातही धक्का; माजी नगराध्यक्षांनी सोडली साथ

ताज्या बातम्या

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

समस्त मंगळवेढेकरांची भावना! शिवतीर्थावरील ‘टाऊन हॉल’ला ‘छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन’ नाव द्या; शिवजयंती उत्सव मंडळाची आग्रही मागणी

February 16, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

February 16, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! साता-बारा होणार कोरा, राज्यात शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरला; ‘या’ दिवशी होणार घोषणा

February 15, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

पतीच्या निधनाचा धक्का! पत्नीनेही सोडले प्राण, एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार; साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

February 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..