टीम मंगळवेढा टाईम्स।
कोणत्या तरी अज्ञात कारणामुळे एका कॉलेज तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 9 च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे अकोला गाव हादरले आहे.
मंगळवेढा तालुक्यातील अकोला येथे घरनिकी-अकोला रोडवरील वरकुटे वस्ती येथे ऊसाच्या शेतात सचिन सिद्धेश्वर वरकुटे (वय 21 रा.अकोला ता.मंगळवेढा) या तरुणाची डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत सचिन वरकुटे हा तरुण सकाळी 9 च्या सुमारास मोटर चालू करण्यासाठी घरासमोरच असलेल्या शेतात गेला होता.
बराच वेळ झाल्यामुळे सचिन मोटार चालू करून आला नाही, कुठे गेला हे पाहण्यासाठी मयत सचिनची आई शेतामध्ये गेली असता सचिन मृतावस्थेत आढळला.
कोणत्यातरी अज्ञात हत्याराने त्याच्या डोक्यावर मारून निर्घृण हत्या केल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, सौरभ शेटे, पोलीस हवालदार दयानंद हेंबाडे, विठ्ठल विभुते, श्रीमंत पवार आदीजण उपस्थित होते.
मयत सचिन मोबाईल फेकला पाण्यात
मयत सचिन वरकुटे यांचा मोबाईल हत्येच्या घटनेवरून जवळच असणाऱ्या एका ओढयामध्ये मिळून आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज