mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पंढरपूर-मंगळवेढामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून माता-भगीनी काम करीत आहेत. फक्त शेती व्यवसाय करुनही उपजिवीका भागत नाही. सततची दुष्काळी परिस्थिती आहे. महिलांना शेतीमध्ये काम करण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ही विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी बचत गटाच्या माध्यमातून या महिलांना आर्थिक स्थैर्य ,आर्थिक पाठबळ व मार्गदर्शन करण्याचे वचन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी दिले आहे.ते देगांव, शरदनगर, घरनिकी, मारापूर, गुंजेगांव, म.शेटफळ, ल.दहिवडी,लें.चिंचाळे, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, जुनोनी, पाठखळ, आंधळगांव आदि ठिकाणी प्रचार दौ-याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.

या प्रचार दौ-यामध्ये पंचायत समिती सभाती प्रदिप खांडेकर, मार्केट कमेटी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक राजेंद्र सुरवसे,सुरेश भाकरे, विजय माने, बाळासो शिंदे,संजय पवार, ॲड.दत्तात्रय तोडकरी, धनंजय पाटील गुरुजी, लक्ष्मण मस्के,बिरा कोळेकर, मारुती गायकवाड, समाधान क्षिरसागर, भारत निकम, परमेश्वर येणपे, खंडू खंदारे,शिवाजी पटाप,  औदुंबर मोरे, हिम्मत पाटील, सतिश मोहिते, रामभाऊ दोलतोडे, गजानन शिंदे, डॉ.लक्ष्मण गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना समाधान आवताडे म्हणाले, विद्यमान लोकप्रतिनिधींना दहा वर्षे संधी दिली, परंतु विकास काय केला हा सा-या जनतेचा प्रश्न आहे. फक्त गाठीभेटी घेतल्या किंवा संपर्क ठेवला म्हणजे विकास झाला असे जनतेने समजायचे का. मंगळवेढयातील एम.आय.डी.स.ची जमीन सौर उर्जा प्रकल्पाला दिली गेली. या ठिकाणा ऐवजी माळरानावर या प्रकल्पाला जागा दिली असती तर या मंगळवेढयातील जागेत अनेक लघु उद्योग उभारले गेले असते. अनेकांच्या हाताला काम मिळाले असते. परंतु दूरदृष्टीचा अभाव आणि वक्रदृष्टीचा दृष्टीकोण  याला कारणीभूत आहे. आई वडिलांनी जन्म दिला, जेष्ठांनी तुम्लाला संस्कार दिले आहेत ,या मातीत तुम्ही रमला आहात आता वेळ आली आहे या मातीचे रुण फेडण्याची. शेतीला पाणी देतो, उद्योग-व्यवसाय उभे करतो. बस्स झाल्या आता तुमच्या या घोषणा. जनतेला जास्त दिवस तुम्ही फसवू शकत नाही. मतदार राजा आता हुशार झाला आहे.  गट-तट बाजूला ठेवा , मतदारसंघाच्या विकासासाठी संधी द्या असे आवाहन उमेदवार समाधान आवताडे यांनी शेवटी केले.

या प्रचार सभांमध्ये प्रा.येताळा भगत, दत्तात्रय जमदाडे,संचालक सचिन शिवशरण, ॲड.दत्तात्रय तोडकरी, डॉ.लक्ष्मण हेंबाडे, प्रा.समाधान क्षिरसागर, मारुती गायकवाड, राहूल भुसे, बनसोडे गुरुजी, पांडूरंग रायबान, प्रमिला शिंदे, सुभाष चौगुले, मुकेश वाडेकर, दिपक सुडके, हणमंत मस्के, अनिल पाटील, वसंत लेंडवे, दत्तात्रय वाघमारे आदिनीही मनोगत व्यक्त केले.

सदर प्रचार दौ-यामध्ये स्वयंस्फूर्तीने अलोट असा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी संबंधीत गावातील चंद्रकांत गरंडे, कांतीलाल मासाळ, परमेश्वर मासाळ, लक्ष्मण गरंडे, संजय पाटील सर, विठोबा मासाळ, गणपत टकले, जगन्नाथ बनसोडे, ईश्वर बनसोडे, सुभाष ढेकळे, गणपत ढेकळे, दगडू मुलाणी, दिलीप भुसे, गोरख टाकळे, बाबु भुसे, चाँद मुलाणी, विठठल पाटील, सिध्देश्वर पाटील, आबा क्षिरसागर, विजय पवार, मनोहर मोरे, विनायक यादव, भगवान आसबे, आबा जानकर,नवनाथ आसबे, संतोष भगरे, सुब्राव यादव, बाबुराव पाटील, संतोष पाटील, डॉ.सत्यवान यादव, बंडोपंत पाटील, दिपक सुडके, बबन म्हमाणे, संभाजी सुडके, नवनाथ सुडके, रामचंद्र जुंदळे, श्रीकांत पाटील, मल्लीकार्जून जुंधळे, योगेश नरळे, हणमंत अनपट, ढोणे सर, बालाजी मेटकरी, बाबू ढोणे, तुकाराम काळुंखे, अंगद चौगुले, अंकुश चौगुले, महादेव चौगुले, सुनिल माळी, संभाजी गोडसे, संतोष माळी, हणमंत मस्के, बळी मस्के, आप्पा शिनगारे, अजीत माळी, बाबासो बाबर, शिवाजी पाटील, हरीदास औताडे, वसंत पाटील, सुभाष गायकवाड, श्रीमंत गायकवाड, हरीभाऊ आवताडे, दत्तात्रय वाघमारे, काकासाहेब पाटील, मधुकर पवार, दादासो लेंडवे, विष्णू लोखंडे, गोरख औताडे, किसन लेंडवे, बलभिम लेंडवे, राजाराम कडलासकर, दगडू बनसोडे, नागन्नाथ बनसोडे, भिमराव बनसोडे, युसूफ शेख, राजकुमार स्वामी, यांचेसह वरील गावातील सरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, सदस्य, पदाधिकारी, मान्यवर, समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते.सदर प्रचार दौ-याच्या सभेचे सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.

हाकेला धावून येणारा नेता : मारुती गायकवाड

मी कोणत्या पक्षाशी बांधील नाही तर जे सत्य आहे त्यांच्या मागे उभा राहणारा आहे. जनतेने खरं काय आहे ते पहावे तर वा-याच्या मागे लागू नये. निवडणूका आल्यावरच त्यांना माता-भगिनी दिसतात आणि साड्या वाटतात. हे लबाडाचं राजकारण त्यांनी बंद करावे. रात्री समाधान आवताडे यांना हाक द्या या हाकेला धावून जाणारे तडफदार असे नेतृत्व समाधान आवताडे आहेत. याचसाठी मी समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर करीत आहे असे त्यांनी सांगितले.

तसेच या प्रचार दौ-याच्या वेळी गुंजेगांव येथे महादेव ढोणे सर, सुधाकर काळुंखे, बाळासो मेटकरी, बिराप्पा ढोणे, महमद मुलाणी, यांनीही समाधान आवताडे यांना पाठिंबा दर्शवून आवताडे गटात जाहीर प्रवेश केला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मतदारसंघाला सत्तेतील आमदार मिळावा म्हणून परिचारकांना निवडून द्या : खा.डॉ.जयसिद्धेश्वर महाराज

मतदारसंघाला सत्तेतील आमदार मिळावा म्हणून परिचारकांना निवडून द्या : खा.डॉ.जयसिद्धेश्वर महाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा