मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
रात्रीचे जेवण करून फेरफटका मारावयास गेलेल्या एका शाळकरी मुलीला ट्रकने चिरडल्याने ती जागीच मयत झाली असून ही घटना मंगळवेढा शहरानजीक असलेल्या बायपास रोडवर रात्री 9.15 वा.घडली आहे. मानसी दत्तात्रय चेळेकर(वय 15) असे अपघातात मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. नागरिकांनी पळून जाणार्या ट्रकचालकाला पकडून पोलीसांच्या हवाली केले आहे.
या घटनेची हकिकत अशी की, यातील मयत मुलगी मानसी दत्तात्रय चेळेकर(वय 15) ही व तिची लहान बहिण या दोघी रात्रीचे जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी शहराच्या बाह्यवळणावर रात्री 10 वा.च्या दरम्यान मार्गावर फिरावयास गेल्या होत्या. यावेळी कर्नाटककडून भरधाव वेगात आलेल्या के.ए-07.ए-1628 या ट्रकने मानसी हिला पाठीमागून ठोकरल्याने ती गंभीर जखमी होवून जागीच मयत झाली.
मानसी ही इयत्ता नववी वर्गात इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना वार्यासारखी मंगळवेढा शहरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाणार्या ट्रकचालकाला नागरिकांनी तात्काळ पकडून पोलीस ठाण्यात हजर केले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांचे पोलीस पथक अपघातस्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी हलविण्यात आला. या अपघाताचा तपास पोलीस करीत आहेत.
————-

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज