mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कत्तलखान्याकडे जाणारा जनावरांचा टेम्पो मंगळवेढा पोलिसांनी पकडला,तिघांविरोधात गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कत्तलखान्याकडे जाणारा जनावरांचा टेम्पो मंगळवेढा पोलिसांनी पकडला,तिघांविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

कत्तलखान्याकडे नेण्याच्या उद्देशाने १० जनावरे घेवून जाणारे वाहन मंगळवेढा पोलिसांनी हुन्नूर येथे पकडून सदर वाहन चालकाविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना दि.२३ डिसेंबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास घडली असून तिघांविरोधात मंगळवेढा पोलिस गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814

पोलिस सूत्रानी दिलेली माहिती अशी,आज  दि.२३ डिसेंबर रोजी पहाटे ४ च्या दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते व पोलीस कर्मचारी नाकाबंदी व चेकिंग करीत असताना घेरडी रोडवरून जाणारा एम.एच १३ ए.एन.६०९५ गाडीमध्ये जवळपास १० जनावरे दाटीवाटीने त्यांची तोंडे दोरीने घट्ट बांधून त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलखान्याकडे नेण्याच्या उद्देशाने सोलापूरकडे जात असताना १)फयाज अब्दुलवहाब कुरेशी (वय.२४ रा. पाणीवेस तालीम,हाजीभाई चौक,शास्त्री नगर सोलापूर) यास पोलिसांनी अटक केली असून चालक जुबेर संपूर्ण नाव माहीत नाही व गायीचा मालक मुज्जीदिन संपूर्ण नाव माहिती नाही हे दोघे फरार आहेत.हुन्नूर येथे पोलिसांनी वाहन पकडून जप्त केले आहे.

त्यामधील जनावरे गोशाळेत जमा करण्यात आली आहेत. या घटनेची फिर्याद पोलिस हवालदार सोमनाथ माने यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते हे करीत आहेत. 

दरम्यान रविवारी सांगोला येथे आठवडा बाजार असल्यामुळे शनिवार, रविवार या दोन दिवशी जनावरांची विक्री मोठया प्रमाणात होते. या बाजारातून दलालवाले जनावरे खरेदी करून त्यांची रवानगी कत्तलखान्याकडे करतात. कत्तलखान्याकडे जनावरे नेण्यास बंदी असतानाही राजरोसपणे दलालवाले वाहनातून त्यांची वाहतुक करीत असल्याचे जनतेच्या निदर्शनास येत आहे. सरकारने यावर बंदी आणली असतानाही महसूल व पोलिस खाते कारवाई करत नसल्यामुळे दलालांचे फावत आहे. 

सरकारने जनावरे घेणार व देणार यांची नोंद बाजार समितीत करणे बंधनकारक केले असतानाही अद्याप याची अंमलबजावणी होत नाही. जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षक यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून यांची अंमलबजावणी जिल्ह्यात केल्यास मुक्या प्राण्यांचे जीव वाचतील अशा प्रतिक्रिया पशुपालकामधून उमटत आहेत.सांगोल्यावरून मंगळवेढा मार्गे कर्नाटकातील कत्तलखान्याकडे जाणार्‍या वाहनांची संख्या अधिक आहे. सीमेवर ही वाहने रोखून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी पशुपालकांची आहे. 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा नगरपालिकेचा भोंगळ कारभार,गटारीचे पाणी रस्त्यावर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मंगळवेढा नगरपालिकेचा भोंगळ कारभार,गटारीचे पाणी रस्त्यावर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

July 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा