मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । वैद्यकीय साहित्याच्या मदतीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे . कोव्हिड – १९ विषाणूचा मुकाबला करण्यासाठी सामाजिक संस्था व विविध कंपन्या सामाजिक बांधिलकी कार्यक्रम अंतर्गत पीपीई किट , ग्लोव्हज , फेस मास्क , ट्रिपल लेअर मास्क , एन – ९५ मास्क , सॅनिटायझर , गॉगल , शु कव्हर , गम बूट , सोडियम हायपोक्लोराईट ५ टक्के द्रावण , फेस शिल्ड , व्हेंटिलेटर्स , ऑक्सिजन सिलिंडर्स , पल्स ऑक्सिमीटर , मल्टिपॅरा मॉनिटर्स अशा वैद्यकीय उपकरणाची आरोग्य विभागांस गरज आहे.
पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील मदत करणाऱ्या इच्छुकांनी पुणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख ( ९४२२०३३४३९ ) , डॉ. नंदा ढवळे ( ९८२२४२८५६० ) यांच्याकडे संपर्क साधावा , असे आवाहन करण्यात आले आहे .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज