mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतक-यांनी व कामगारांनी दामाजी कारखाना वाचवला : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शेतक-यांनी व कामगारांनी दामाजी कारखाना वाचवला : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी व शेतकऱ्यांनी कारखान्याचे मंदिर वाचवण्याचे काम केले असे मत चेअरमन  समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.


     

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात खेळीमेळीत पार पडली

     

सुरुवातीस श्री संत दामाजीपंत, कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व।कि।रा।मर्दा व संस्थापक व्हा।चेअरमन स्व।र।शि।शहा यांच्या प्रतिमेचे पूजन कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे व व्हा।चेअरमन अंबादास कुलकर्णी यांचे हस्ते करण्यांत आले। कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण यांनी अहवाल सालात मयत झालेल्या थोर व्यक्ती, संस्थेचे सभासद व कामगार यांच्या श्रध्दांजलीचा ठराव मांडला

     

समाधान आवताडे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, एकही उपपदार्थ नसतांना फक्त साखर उत्पादन करुन एफआरपी २ हजार २२४ शेतकऱ्यांनी आपल्या बरोबरीच्या कारखान्याप्रमाणे स्पर्धात्मक दर दिलेला आहे। कारखान्याच्या वाटचालीमध्ये अनंत अडचणी आल्या परंतु आपणा सर्वांची संस्थेवर असणारी निष्ठा व सहकार्यामुळे त्या अडचणीवर मात करुन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। येथून पुढे फक्त साखर उत्पादन करुन पुढे कारखानदारी टिकणे अवघड आहे म्हणून आपल्या कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पाचा भुमीपूजन नुकताच संपन्न झाला असुन या प्रकल्पातुन इथेनाùल, स्पिरीट, अल्कोहोल निर्मिती होवून कारखान्यास अतिरिक्त उत्पन्न सुरु होणार आहे त्यामुळे शेतकÅयांना ऊसास जादा दर देणे, तोडणी वाहतुकदारांचे बील व कामगारांचे पगार वेळेत करणेसाठी निश्चित मदत होणार आहे।  हा आसवनी प्रकल्प एका वर्षाच्या आत उभा करणार आहे।

      

आमचे संचालक मंडळाने कारखान्यावर नवीन शुगर सायलो सिस्टिम सुरु केल्याने साखर हमाली, साखर पोती शिलाई, नंबरींगचे काम यासाठी दरवर्षी होणारा रु। २० ते ३० लाख खर्च वाचणार आहे। तसेच साखरेचे तपमान कमी होवून साखरेचा कलर सुध्दा जास्त दिवस टिकणार आहे। कारखान्यने ३१ वर्षाच्या काळामध्ये अनेक चढ-उतार पाहिले। शेतकरी व कामगारामुळे हे शेतकÅयांचे मंदिर चांगले टिकले। सध्या कारखान्यावर असणारी शेतकÅयांची निष्ठा, सभासदांचा विश्वास व कामगारांचे प्रेम यामुळेच फक्त साखर उत्पादनावर आपला कारखाना चालत आहे।  सध्या आपलेकडे जवळपास २ लाख ४० हजार पोती साखर साठा शिल्लक असून शासनाचे धोरणानुसारच साखर विक्री सुरु आहे।

  

साखरेचे दर कमी असलेने रु। ७४ चे बिल व  कामगारांचे पगार करणेस विलंब लागला आहे। सध्या साखरेचे दर बाजारपेठेत टिकून असलेने अनंत अडचणीवर मात करुन शेतकÅयांच्या ऊसाचे बिल रुपये ७४/- व कामगारांचा पगार लवकरच अदा करण्यात येणार आहे। येणाÅया सन २०१९-२० या गाळप हंगामामध्ये चार लाख मे।टन ऊस गाळपाचे उदिदष्ठ पुर्ण करणेसाठी सर्व सभासदांनी आपला संपूर्ण ऊस दामाजीस घालून सहकार्य करावे। आपणांस तालुक्याच्या हिताच्या सर्व गोष्टी विचारात घेवून त्या पूर्ण करावयाच्या असुन कारखान्याची परिस्थिती व शासन धोरण याचा विचार करता वचनाची पुर्तता करणेत येईल।

      

व्यासपिठावर व्हा।चेअरमन अंबादास कुलकर्णी व सर्व संचालक यांचेसह पंचायत समिती सभापती प्रदिप खांडेकर, शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत पडवळे, दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ आवताडे, माजी सभापती भुजंगराव पाटील, माजी संचालक महादेव कोरे, नारायण शिंदे, पंढरपुरचे विनोद लटके, अùड।दत्तात्रय तोडकरी, मार्वेŠट कमिटीचे संचालक दत्तात्रय गायकवाड, भालेवाडीचे सरपंच प्रताप गवळी उपस्थित होते।

      

संचालक अशोक केदार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। पुढे बोलताना म्हणाले की, कारखान्याची उभारणी स्व।कि।रा।मर्दा उर्फ मारवाडी वकील, स्व।रतनचंद शहा, यांनी केली। चेअरमन सर्व संचालक मंडळ व सर्व सभासदांना समान वागणुक देत आहे। आतापर्यंत आम्ही आमचे मार्गदर्शक चेअरमन मा।समाधानदादा आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असून सध्या कामकाजामध्ये आम्ही अत्यंत काटकसर, पारदर्शकता, चिकाटी ठेवलेली आहे।

      

कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार लक्ष्मण आसबे यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले। विषयपत्रिकेवरील विषयांना सभासदांनी खेळीमेळीच्या वातावरणात टाळयांच्या गजरात मंजूरी दिली। अतिशय अडचणीतुन मार्ग काढून कारखान्याचे चेअरमन मा।श्री।समाधानदादा आवताडे यांनी अत्यंत काटकसरीने कारभार करुन पैसा उपलब्ध करुन कारखान्याचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरु आहे। कारखान्याचे सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कार्यकारी संचालक व चेअरमन यांनी समाधानकारक  व योग्य अशी दिली। दहा रुपये किलो साखर व आसवनी प्रकल्पाचे भुमीपुजन करुन वचननाम्यातील आश्वासने पूर्ण केलेबद्दल सर्व सभासदांच्या वतीने संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव श्री कुरडे यांनी मांडला व त्यास सर्वांनी मंजुरी दिली।

      

यावेळी कारखान्याचे संचालक लक्ष्मण एकनाथ जगताप, राजेंद्र दामोदर सुरवसे, राजीव सुब्राव बाबर, शिवयोग्याप्पा सायबण्णा पुजारी, बापू मधुकर काकेकर, बसवेश्वर शंकर पाटील, मारुती लिंगाप्पा थोरबोले, रामकृष्ण जोतीराम चव्हाण,  भुजंगराव मारुती आसबे, सुरेश बापू भाकरे, बाळासोा पांडुरंग शिंदे, सचिन गोपाळ शिवशरण, अशोक आण्णाप्पा केदार, सौ।स्मिता प्रमोदकुमार म्हमाणे, सौ। कविता भारत निकम, संजय सुब्राव पवार, विजय धानाप्पा माने, अशोक गुराप्पा माळी, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन सभासद, शेतकरी, हित्चिंतक, वाहतुक ठेकेदार, पत्रकार, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, सेक्रेटरी भारत मासाळ, कामगार पतसंस्थेचे चेअरमन उत्तम भुसे, व्हाईस चेअरमन रमेश पाटील, हित्चिंतक, तोडणी ठेकेदार, मजूर, ऊस वाहतुक कंत्राटदार आदि उपस्थित होते। सभेकरिता कारखान्याचे प्र।सूरक्षा अधिकारी लक्ष्मण बेदरे यांचे मार्गदर्शनाखाली बंदोबस्त चोख ठेवला होता। सभेमध्ये कोणताही गोंधळ न होता सभा तब्बल दीड तास शांततेत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। रात्री पाऊस झालेने प्रशासनाची धांदल उडाली परंतु वेळेत नेटके नियोजन करणेसाठी कारखान्याचे सर्व विभागाचे खातेप्रमुख, उपखातेप्रमुख व सर्व कर्मचारी यांनी अतिशय परिश्रम घेतले। कारखान्याचे संचालक  बाळासाहेब शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
अपक्ष नाही,पक्षातूनच लढणार आमदार भारत भालकेंची भूमिका

अपक्ष नाही,पक्षातूनच लढणार आमदार भारत भालकेंची भूमिका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

कामाची बातमी! देवस्थान इनाम जमिनींबाबत महत्वाची अपडेट; राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

April 23, 2026
भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे आज कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

भजन आणि कीर्तनाच्या गजरात खुपसंगी येथे आज कै.सीताराम सलगर व कै.भामाबाई सलगर यांचा १५ वा पुण्यस्मरण सोहळा संपन्न होणार

April 23, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

उन्हाळ्यात पावसाळा! नागरिकांसाठी सूचना जारी; ‘हे’ जिल्हे आज ‘यलो अलर्ट’वर; ‘या’ दिवसापर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता

April 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

भावा-भावातील वाद विकोपाला! मंगळवेढ्यात शेतीच्या वादातून तुफान हाणामारी; संतापलेल्या भावाचा थेट डोक्यात प्रहार

April 22, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा