mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भूलथापांच्या राजकारणाला वचनपूर्तीने उत्तर देणार : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 12, 2020
in Uncategorized, राजकारण
भूलथापांच्या राजकारणाला वचनपूर्तीने उत्तर देणार : समाधान आवताडे



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-





कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही वचननामा घेऊन जनतेपर्यंत आलो होतो. त्यापैकी बऱ्याच वचनांची पूर्तता संचालक मंडळाने केलेली असून त्यामधीलच वचन कारखान्यांमध्ये डिस्टलरी प्रकल्प उभा करणे, त्याची आता मंजुरी मिळालेली आहे. तो प्रकल्प उभारणीस आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. त्याच प्रमाणे सभासदांना दिलेले अभिवचन म्हणजे सभासदास दहा रुपये प्रति किलो साखर देण्याचे वचन ही पूर्ण केलेले आहे. तसेच आपल्या कारखान्यांमध्ये शुगर हाऊसला सायलो सिस्टीम नव्हती तीही आपण कार्यान्वित केलेले आहे. पूर्वीच्या कर्जाचा डोंगर घेऊन कारखान्याचा कारभार करीत आहोत. तरीही सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या कारखान्याचे कामकाज चालू आहे. दामाजी कारखाना  हे सभासदांचे मंदिर असून त्याला जोपासण्याचे काम  संचालक मंडळ करीत आहे. आजपर्यंत या मतदारसंघांमध्ये सगळ्यांना आपण संधी दिलेली आहे. परंतु आतापर्यंत आपल्या पदरात निराशाच पडली आहे. आपण आजपर्यंत फक्त आश्वासनांना भुलत गेलेलो आहे. यासाठीच यावेळी एक संधी देऊन पहा असे आवाहन समाधान आवताडे यांनी केले.






आपल्या पुढील राजकिय वाटचाली संदर्भात जनतेशी सुसंवाद साधन्यासाठी  सिद्धनकेरी, रड्डे, शिरनांदगी, चिक्कलगी, पौट, माळेवाडी व निंबोणी या गावाचा गाव भेट दौरा केला.



पुढे बोलताना ते म्हणाले की स्वतंत्र पूर्वीच्या काळात ज्या अडचणी होत्या त्याच अडचणीमध्ये आपण अजूनही अडकून पडलो आहोत, प्रश्‍न शासन दरबारी फक्त मांडण्यासाठी नाही, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलेले असते येणाऱ्या काळामध्ये या कार्यपद्धतीमध्ये बदल नाही केल्यास पुढील काळ अंधकारमय असणार आहे. यासाठी सर्वांनी मिळून  मतदार संघाच्या विकासासाठी पाऊल टाकूया. तसेच मतदार संघातील जनतेला बरे वाटावे म्हणून आत्तापर्यंत पाण्याची फक्त राजकारण करण्यात आले. परंतु खरे वाटण्यासारखे ते कधी वागले नाहीत.



त्याचप्रमाणे पौट गावातील तलावाचा प्रश्न यापूर्वीच मार्गी लागायला हवा होता. बाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून तो प्रश्न मार्गी लागला असता तर अनेक गावच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता.



दौऱ्याच्या प्रसंगी शिवसेना मा. तालुकाप्रमुख येताळा भगत सर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, युवराज कांबळे सर, बाळासो होवाळे, मधुकर हत्ताळी आदींनीही आपले मत मांडले.



या गावभेट दौय्राप्रसंगी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, शिवसेना मा. तालुकाप्रमुख येताळा भगत, मार्केट कमिटी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, सुरेश भाकरे, रामकृष्ण चव्हाण, भारत निकम, लक्ष्मण मस्के, सुनील लोखंडे, डॉ. लक्ष्मण हेंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.



वरील गावातील गिरमल कोरे, हनुमंत कोरे, शिवाजी कोरे, सिद्धाराम कोरे, सकलेश कोरे, उदय माने, रड्डे गावचे सरपंच संजय कोळेकर, भारत पाटील, ज्योतिबा पाटील, युवराज कांबळे, तुकाराम सांगोलकर, मोहन सांगोलकर, पंचायत समिती माजी सदस्य भीमराव कांबळे, नामदेव कोकरे, जयसिंग लोखंडे, सुरेश कांबळे, दुर्योधन कांबळे, शिरनांदगी चे सोसायटीचे मा. चेअरमन जनार्दन थोरबोले, आप्पा चोपडे, पांडुरंग जानकर, पांडुरंग कांबळे, विठ्ठल आसबे, महादेव मासाळ, शंकर थोरबोले, संतोष बिराजदार, गोरखनाथ आलदर, तुकाराम खांडेकर, रमेश काशीद, संतोष बिराजदार, महादेव खताळ, चिक्कलगी सोसायटीचे मा. चेअरमन मीगोंडा बिराजदार, उपसरपंच अमृत उमराणे, बसवंत बिराजदार, यशवंत मुळीक, शिवाजी पवार, संगमेश्वर बिराजदार, भाऊ पवार, बसवंत हत्ताळी, उमेश निकम, शिवगोंडा हत्ताळी, चंद्रकांत लोणी, माळेवाडीचे महांतेश स्वामी साहेब, सरपंच मळसिद्ध माळी, माजी सरपंच सुरेश कोरगोंडे, गोविंद भोरकडे, माळाप्पा माळी, भीमराव भोसले, गुरय्या स्वामी, बाळू भोसले, मल्लाप्पा चौधरी, दयानंद स्वामी, पैटगावचे सरपंच राजू निमंगरे, सोसायटीचे चेअरमन माळाप्पा माने, मा. सरपंच महादेव निमंगरे, पितांबर निमंगरे, चिदानंद बोरकडे, अरविंद सांगोलकर, निंबोणीगावचे सरपंच बबन शिंदे, उपसरपंच भारत सलगर, ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे, ज्ञानू येडवे, तुकाराम ढगे, तुकाराम खांडेकर सोसायटीचे चेअरमन अंकुश माळी, चंद्रकांत कोळी, गौडाप्पा पाटिल, रेवाप्पा होनराव, मा. सरपंच रंगा बंडगर, खांडेकर गुरुजी, तसेच संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, मा. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले आभार सुनिल लोंखडे यांनी मानले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले? दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांची मोठी खेळी

July 23, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
एका बाजूला यांची मोदींची गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला दर दिवसाला शेतकरी आत्महत्या करतोय; ही स्थिती किती दिवस चालू द्यायची; शरद पवारांनी साधला निशाणा

विलिनीकरण की भाजपसोबत जायचं? शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं? थेट बड्या नेत्यानेच सांगितली आतली खबर

July 9, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना विमाभरपाई द्यावी:आ.भारत भालके

मंगळवेढ्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना विमाभरपाई द्यावी:आ.भारत भालके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा