mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात पाण्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली आहे : समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यात पाण्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली आहे : समाधान आवताडे

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

पाण्याच्या प्रत्येक पाळीसाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे.त्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.आपली राजकीय ताकद कमी पडत असल्याने आपल्यावर ही वेळ आली आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न न सुटल्यास त्यासाठी लढा उभारण्याची वेळ आली तर मी तुमच्यासोबत नेहमी आहे असे प्रतिपादन चेअरमन समाधान आवताडे यांनी केले.जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी मारापुर, घरनिकी, ढवळस, मल्लेवाडी, देगाव या गावच्या गाव भेटी प्रसंगी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले माण नदी कोरडी पडलेली आहे. उजनी कॅनॉलद्वारे माण नदीला अतिरिक्त पाणी सोडल्यास पिण्याचा पाण्याचा प्रश्न, पशुधन चारा प्रश्न, पिकाचा प्रश्न सुटणार आहेत. पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने आलेली हातची पिके गेली आहेत. पाळीचे पाणी सोडल्यास पाण्याची पुढची पाळी कमी होणार आहे. यासाठी अतिरिक्त पाणी माण नदीला सोडण्यासाठी शासन स्तरावर मी प्रयत्नशील आहे

कोणत्याही प्रकारचे बायप्रॉडक्ट नसताना संचालक मंडळाने कारखाना चांगल्याप्रकारे चालविला आहे. यामध्ये शेतकरी, कामगार यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. आता आपल्या कारखान्याचे डिस्टलरी प्रकल्पाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. नदीला पाणी असेल तर लाईट नसते लाईट असेल तर नदीला पाणी नसते अशी शेतकर्‍यांची दुरवस्था दूर करण्यासाठी मतदारसंघातील असंख्य समस्या सोडवणेसाठी एकत्र येऊया. तसेच बचत गटाच्या माध्यमातून उद्योगधंदे उभा करून प्रगती करा त्यासाठीचे मार्गदर्शन आणि योगदान देण्यासाठी मी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

सदर प्रसंगी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, शिवसेना मा. तालुकाप्रमुख येताळा भगत सर, संचालक राजेंद्र सुरवसे, मार्केट कमिटी सभापती सोमनाथ आवताडे, कारखान्याचे संचालक सुरेश भाकरे, भुजंगराव आसबे, सचिन शिवशरण, अशोक माळी, भारत निकम, अविनाश मोरे, शिवाजी भुसे, उत्तम  भुसे, आदी मान्यवर उपस्थित होते.विनायक यादव, अविनाश मोरे, देवाप्पा हेंबाडे, विश्वनाथ हेंबाडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या गावभेटी दौऱ्याच्या वेळी डॉक्टर सत्यवान यादव, विनायक यादव, सुबराव यादव, राजकुमार यादव, भगवान आसबे, पिंटू मांडवे, सत्यवान यादव, संतोष यादव, अशोक यादव, पांडुरंग माने महाराज, दिलीप आसबे, उत्तम भुसे, बाळासो भुसे, चंद्रकांत भुसे, अंकुश भुसे, अंकुश  क्षीरसागर, बापू भुसे, विठ्ठल इंगळे, चांद मुलानी, नितीन भुसे, संजय भुसे, दत्ता मोरे, विजय पवार, गोरख टाकळे, शिवाप्पा हेंबाडे, देवाप्पा हेंबाडे, भाऊसाहेब हेंबाडे, महादेव हेबांडे, समाधान मोरे, रवी हेबांडे, विश्वनाथ  हेंबाडे, संतोष बावचे, तुकाराम पुजारी,  अनंत मोरे, खंडू  खंदारे, अजित माळी, विठ्ठल माळी, प्रशांत मेटकरी, संभाजी गोडसे, रायबान, अजित गोडसे, बालाजी रायबान, सुभाष ढेकळे, हनुमंत मस्के, दशरथ ढेकळे, अजित माळी, किशोर मोरे, आनंदा डोईफोडे, बबन बनसोडे, बाळू ढेकळे, गणपत ढेकळे, शंकर पाटील, बालाजी ढेकळे, बाबुराव ढेकळे, विठ्ठल मेटकरी, नाथाजी मेटकरी, ईश्वर बनसोडे तसेच सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले आभार डॉक्टर सत्यवान यादव यांनी मानले.

गाव भेट दौरा चालु असताना तेथील दुष्काळाची परिस्थिती व जनावरांच्या हालत पाहता दौरा  संपल्यावर चेअरमन समाधान आवताडे थेट सोलापूर येथे अधीक्षक अभियंता श्री साळे साहेब यांच्याशी समक्ष चर्चा करण्यासाठी गेले व अधीक्षक अभियंता यांच्याशी उजनी कॅनॉल द्वारे अतिरिक्त पाणी माण नदीला सोडणे बाबत चर्चा केली. नदीमध्ये पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या गुंजेगाव, शेटफळ, महमदाबाद, तनाळी, मारापुर, तावशी, चिचुबे, सिद्धेवाडी, घरनिकी, मल्लेवाडी, ढवळस, धर्मगाव, ओझेवाडी या 14 गावातील पिण्याचा तसेच पशुधनाचा प्रश्न गंभीर असून येथील जनतेची माण नदीमध्ये पाणी सोडण्याबाबत भावना तीव्र असल्याचे त्यांनी या चर्चेमध्ये सांगीतले. सदरचे पाणी सोडल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होऊन पशुधन वाचवण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले या मागणीवर सकारात्मक चर्चा होऊन येत्या आठ दिवसात माण नदीमध्ये पाणी सोडू असे अधीक्षक अभियंता श्री साळे साहेब यांनी सांगितल्याचे समाधान आवताडे यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन

मंगळवेढ्यात आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

एका रागाचा असाही अंत! मोबाईलवरून रागावताच नववीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल; सोलापुरात पालकांवर दुःखाचा डोंगर

March 21, 2026
ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

ईदचा गोडवा वाढला! अनिल (दादा) सावंत फाउंडेशनकडून ३ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप; मंगळवेढ्यात सामाजिक सलोख्याची नवी मिसाल; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

March 21, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

​मंगळवेढ्यात अवैध क्लासेसचा सुळसुळाट; पदवी नसलेलेही ‘मुन्नाभाई’ शिकवतायत धडे; शिक्षणाच्या नावाखाली पालकांची लूट, अवैध क्लासेसवर कारवाई कधी? प्रशासन झोपलेय का?

March 21, 2026
अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

अशोक खरातची संगत भोवली, रुपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा पहिला मोठा निर्णय; चाकणकर यांनी पत्रात काय लिहिलं?

March 21, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

काय झाडी, काय डोंगर… अन काय तो पेपर! भूगोलाच्या पेपरात ‘नापास’ होण्याची भीती, पठ्ठ्यानं थेट प्रश्नपत्रिकाच केली चोरी

March 20, 2026
वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

वृक्षारोपणाने गुंफले सामाजिक उत्तरदायित्व! श्री वैभवलक्ष्मी महिला पतसंस्थेचा ३रा वर्धापनदिन दिमाखात साजरा

March 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा