मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सोलापूर जिल्हा विधानपरिषद सदस्य प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार प्रशांतराव परिचारक संयोजन समिती मंगळवेढा यांच्या वतीने आज शुक्रवारी रोजी सकाळी १० वाजता शिवप्रेमी चौक येथे प्रथमच भव्य व खुल्या प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, कबड्डी खेळाडूंनी व कबड्डी चाहत्यांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटनसोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी ना.विजयकुमार देशमुख (मालक) यांच्या हस्ते व माजी पालकमंञी प्रा.लक्ष्मणरावजी ढोबळे सर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेसदर च्या स्पर्धे करीता प्रमुख उपस्थिती युटोपीयन शुगर्सचे चेअरमन उमेशराव परिचारक व जिल्हा परीषद सदस्य वसंतनाना देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
ग्रामीण भागात प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून या खेळाची माहिती व प्रसार व्हावा या उद्देशाने सदर च्या प्रो-कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवेढा या दामाजीपंतांच्या भूमीमधून अनेक खेळाडूंनी विविध क्षेत्रात आपले नावलौकिक कमविलेले आहे. मात्र, प्रो-कबड्डी या खेळासही भरपूर वाव असल्याने या खेळाची माहिती,नियम,व खेळ या भागातील खेळाडूंना व क्रीडा प्रेमींना माहिती व्हावा व या खेळाचा अधिकाधिक प्रसार व्हावा म्हणून सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांतरावजी परिचारक (मालक) यांच्या वाढदिवसानिमित्त शिवप्रेमी चौक आठवडा बाजार,मंगळवेढा येथे शुक्रवार दिनांक २३/०८/२०१९ रोजी सकाळी ठिक १० वाजता भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज