मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर-तांडोर विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये संस्था सभासदांच्या नावे बोगस कर्ज वाटप करून 1 कोटी 1 लाख 20 हजार 500 रुपयाचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सचिव सुभाष महादेव शिंदे (रा.डोणज),बँक इन्स्पेक्टर नवनाथ लक्ष्मण गुंड (रा.वडापूर ता. द.सोलापूर),शाखाधिकारी बापूराव विठ्ठल देशमुख (रा.मंगळवेढा) या तीघांविरूध्द मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,सिध्दापूर-तांडोर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये दि. 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या कालावधीतील चाचणी लेखा परीक्षण करण्यात आले. यामध्ये संस्था सभासदांच्या नावे बोगस कर्ज वाटप करून 86 लाख 78 हजार 74 रुपये एवढया रकमेचा संस्थेचे सचिव सुभाष शिंदे यांनी वैयक्तिकपणे सभासद कर्ज वसुलीची रक्कम 14 लाख 42 हजार 436 एवढया रकमेचा स्वतःच्या फायदयाकरीता उपयोग करून अपहार केला. सोसायटीची एकूण अपहारित रक्कम 1 कोटी 1 लाख 20 हजार 510 इतकी लेखा परीक्षणमध्ये आढळली आहे.
दरम्यान वरील तीघा आरोपींनी संगनमत करून हा घोटाळा केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वैभव मारकड हे करीत आहेत.या अपहाराची फिर्याद दिपक तुळशीराम गायकवाड याने दिल्यानंतर वरील तीघाविरूध्द गुन्हा दाखल झाला असून तालुकयातील इतर सोसायटी सचिवामधून खळबळ उडाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज