मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथून गेल्या सहा दिवसापूर्वी अपहरण झालेल्या प्रतीक शिवशरण या नऊ वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या झाल्याचे काल गुरुवारी उघडकीस आले होते. दरम्यान या घटनेनंतर प्रतिकचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांनी नकार दिला होता.आरोपींना अटक करण्याचा आश्वासना नंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन आज शुक्रवारी सांयकाळी ५.३० च्या सुमारास माचणूर येथे प्रतीकवरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
माचणूर येथील इयत्ता तिसरीत शिकणारा प्रतीक मधुकर शिवशरण गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होता. मुलाच्या पालकांनी पोलिसाकडे दाद मागितली परन्तु पोलिसांनी तब्बल 22 तासांनी याची दखल घेत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र त्याला शोधण्यात अपयश आले होते.माचणूर येथील महादेव डोके यांच्या उसाच्या शेतात शेळ्या राखणाऱ्या एका महिलेला हा मृत देह आढळून आला.
स्थानिक पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी जंगजंग पछाडत त्या अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेतला. परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. गुन्हे अन्वेषण विभागाने गावातील सुमारे पन्नास जणांची चौकशी केली तसेच गावालगतचा पूर्ण परिसर पालथा घातला तरीही हाती काही लागले प्रतीक्षा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला मात्र कोणताही सुगावा हाती लागत नव्हता. गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रतिकच्या शरीरावरजखमा आहेत.
दरम्यान ही घटना उघडकीस आल्यामुळे तालुकाभर खळबळ माजली आहे. दरम्यान मयत कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला होता. पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे प्रतीक चा बळी गेल्याची भावना संतप्त कुटुंबियाकडून व्यक्त होत होती.आरोपींना अटक करण्याचा आश्वासना नंतर कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेऊन आज शुक्रवारी सांयकाळी ५.३० च्या सुमारास माचणूर येथे प्रतीकवरती शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज