गिलनेट फिशरी अँड ऍग्रोसोबत बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्यशेती करा अन लाखो रुपये कमवा!
समाधान फुगारे । न्युज मंगळवेढा टाईम्स
जास्तीत जास्त नफा मिळवून देण्यासाठी निरोगी मासे तयार करणे हे मत्स्यपालनाचे उद्दीष्ट आहे. सध्याच्या काळात बायोफ्लॉक तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर सक्रिय होत असून मस्त्य उत्पादनासाठी हे तंत्रज्ञान आर्थिकदृष्टया किफायतशीर ठरत आहे. त्यामुळे हे शेतीला शाश्वत उत्पादन देणारे महत्त्वाचे बायोफ्लॉक तंत्रज्ञान आहे.
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ (युटोपीयन शुगर्सच्या समोर) येथे पहिल्यांदाच सुरु असलेल्या उपक्रमात सोलापूर जिल्हा प्रशासनाने सघन जलचरांना प्रोत्साहन देण्यासाठी बायोफ्लॉक शेती तंत्रज्ञान सादर केले.
गिलनेट फिशरी अँड ऍग्रो फार्मचे संचालक आंनद ताड म्हणाले, बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकरी 3 गुंठे क्षेत्रात 7 कृत्रिम टाक्यांमध्ये मासे वाढवू शकतात.
बायोफ्लॉक तंत्रज्ञानामुळे प्रत्येकी 3 गुंठे क्षेत्रामध्ये लहान टाक्यांमध्ये 4 ते 5 हजार किलोग्राम मासे तयार होऊ शकतात.
लोकांनी पुढे यावे आणि या योजनेचा लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे. प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) अंतर्गत केंद्र सरकार या उपक्रमासाठी 40 ते 60 टक्के अनुदान देखील देते.
बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचे फायदे
कमी जागेत व कमी कालावधीत कमी पाण्यामध्ये बायोफ्लॉक तंत्रज्ञान प्रभावी उत्पन्न देणारे आहे. शेतीला शाश्वत उत्पादन देणारा एक पूरक व्यवसाय होतो. एकदाच गुंतवणूक आहे, परंतु वर्षांतून दोन वेळेस उत्पन्न देणारे आहे.
अत्यल्प व अल्पभूधारक शेतक-यांना आर्थिकदृष्टया परवडणारे आहे. उत्तम दर्जेचे व चांगल्या गुणवत्तेचे मत्स्य उत्पादन मिळते.
बायोफ्लॉक तंत्रज्ञान म्हणजे काय?
बायोफ्लॉक तंत्रज्ञान (बीएफटी) हे मत्स्यपालनात “निळ क्रांती” मानले जाते. हे एक पर्यावरणास अनुकूल जलसंपदाचे तंत्र आहे जे शेतीत पर्यावरणाचे नियमन वाढविण्यासाठी विकसित केले गेले आहे.
हे एक इझ्राईल तंत्रज्ञान पद्धत आहे. सदर टाक्यातील पाण्याचा उपयोग हा फळ बाग,भाजी व इतर शेतीसाठी वापर करता येतो.
बायोफ्लॉक तंत्रज्ञानाचा हेतू काय आहे?
तपमान, विरघळलेल्या ऑक्सिजनची पातळी इत्यादी पाण्याचे पीएच स्तर तपासल्यानंतर ही पद्धत लागू केली जाऊ शकते.
बायोफ्लॉकची रचना आणि पौष्टिक मूल्य:
भारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन आहे. या तंत्राविषयी शेतकरी, व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे. या तंत्राविषयी अधिक माहिती घेऊयात.
पारंपारिक मत्स्य व्यवसाय शेततळ्यांमध्ये केला जातो. मात्र, या पद्धतीमध्ये खाद्य वाया जावून उत्पादन खर्चात वाढ होते. पर्यायाने नफा कमी होतो. त्याच प्रमाणे शेततळ्यातील वातावरणावर आपल्याला फारसे नियंत्रण ठेवता येत नाही. माशांची वाढ नियमित होत आहे किंवा नाही, होणारे आजार यावरही व्यवस्थित लक्ष ठेवणे अशक्य होते.
पूर्व आशियातील इझ्राईल, इंडोनेशिया, जपान व चीन या देशांमध्ये आधुनिक बायोफ्लॉक पद्धतीचा वापर मत्स्यपालनासाठी अनेक वर्षापासून केला जात आहे.
मत्स्यपालन हे फायदेशीर राहण्यास मदत झाली आहे. या पद्धतीत खाद्याचे नियोजन, रोगांचे नियंत्रण व उपचार करणे सोपे आहे. बायोफ्लॉक पद्धतीमध्ये सुक्ष्मजीवांचा वापर करून उर्वरित अन्न, माशांची विष्ठा व अन्य घटकांचेही माशांच्या नैसर्गिक खाद्यात रुपांतरण केले जाते.
हे सातत्याने बनणारे पोषक अन्न माशांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरते. खाद्यांचा खर्च पर्यायाने उत्पादन खर्चात बचत होते. सूक्ष्मजीवांमुळे पोषक घटक व सूक्ष्म वातावरण तयार होऊन माशांना होणारी रोगराई व सामान्य आजार यांचे प्रमाण अत्यंत कमी राहते. माशांची वाढ उत्तम होते.
बायोफ्लॉक पद्धतीचा अवलंब
छोटे व मोठे शेतकरी, व्यावसायिक किंवा बेरोजगार तरूण मंडळी या तंत्राने मत्स्यपालन करू शकतात.
हा व्यवसाय बायोफ्लॉक पद्धतीने व चिकाटीने केल्यास स्वयंरोजगाराचे उत्तम साधन ठरू शकते.
यासाठी एक टारपुलीन टँक (15 हजार लिटर क्षमता, 5 डाया मीटर) आवश्यक असतो. 7 टँकचा संपूर्ण खर्च साधारणपणे 5 लाख 50 हजार रुपयांपर्यंत येतो.
यासाठी फक्त 40× 80 फूट जागा लागत असल्याने अल्पभूधारक शेतकरीही ते करू शकतो.
व्यवसायाची सुरुवात
व्यवसाय सुरू करण्याआधी चांगल्या संस्थेतून किमान 2 ते 3 दिवसाचे प्रशिक्षण घेणे अत्यावश्यक आहे.
पहिले छोट्या सेटअपपासून (7 टँक) सुरूवात करावी. नंतर आपल्या अनुभवानुसार व्यवसायात वाढ करत जावी. एकदम मोठे धाडस करण्याची आवश्यकता नाही.
माशांच्या सामान्य प्रजाती विशेषतः बाजारामध्ये सहज, चांगल्या दरात विकल्या जाणाऱ्या प्रजाती बायोफ्लॉकमध्ये पाळाव्यात.
माशांच्या ‘या’ प्रजाती करू शकतो
चिलापी, पाबदा, शिंगी, व्हीतनाम कोई, रुपचंद, फंगेशीयश, पंकज आदी प्रजातींची या टाक्यांमध्ये मत्स्यव्यवसाय करू शकतो.
व्यवसाय सुरू करण्यासाठी येथे करा संपर्क
मंगळवेढा तालुक्यातील पाठखळ येथील गिलनेट फिशरी अँड ऍग्रोच्या माध्यमातून हा व्यवसाय आपण सुरू करू शकता.
व्यवसाय सुरू करणाऱ्या प्रत्येकाला संस्थेमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बायोफ्लॉक मत्स्य शेती सुरू करता येणार आहे.
77 90 992 992 व 78 09 99 11 55
येथे आपण संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता.
बाजारपेठ येथे उपलब्ध
आपल्या परिसरातील बाजारपेठेत सुद्धा हे ताजे मासे आपण विकू शकता..अन्यथा गिलनेट फिश ऍग्रोच्या माध्यमातून कंपनी आपल्याकडून मासे खरेदी करेल.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज