mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भिशी व फायनान्सचे आमिष पडले महागात; गोड बोलून साडेआठ लाखांना फसवले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 7, 2020
in क्राईम
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

फायनान्स व भिशीच्या माध्यमातून जास्त फायदा होण्याचे आमिष दाखवून प्रवीण रामजी पुजारी (रा. लेप्रसी कॉलनी, जीवन विकास नगर, कुमठा नाका) यांना साडेआठ लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी चौघांविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

लक्ष्मीकांत लक्ष्मीनारायण कुरापाटी, अंबिका कुरापाटी, पूजा कुरापाटी (सर्वजण रा. वरद फायनान्स, सत्तर फूट रोड), नागेश पाचकंटी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

कुरापाटी हे पिग्मी गोळा करण्यासाठी येत असल्याने पुजारी यांची चांगली ओळख झाली. त्या ओळखीतून ही रक्‍कम पुजारी यांनी संबंधितांना दिली होती. काही दिवसांनी पुजारी यांना पैशाची गरज पडली आणि त्यांनी कुरापाटी यांच्याकडे पैशांची मागणी केली.

मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

दुकानदाराची नजर चुकवून दुकानातून पळविला मोबाईल

मोबाईल दुकानात मोबाईलचा स्टॉक लावत असताना दुकानदाराची नजर चुकवूनचोरट्याने मोबाईल चोरून नेला.

नितीन मोबाईल मॉल, नवी पेठेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी सोमनाथ भीमाशंकर गायकवाड (रा. उत्तर कसबा, लोणार गल्ली) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोमनाथ यांचे लक्ष नसल्याचा फायदा घेऊन व नजर चुकवून चोरट्याने मोबईल चोरून नेला.

या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक श्री. पैकेकरी हे करीत आहेत.

पाच लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा केला छळ

माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती विनोद पारीख, भगीरथ पारीख, शांताबाई पारीख, महेंद्रकुमार पारीख, अर्चना पारीख (सर्वजण रा. सद्‌गुरू समर्थ सोसायटी, कांचन नगर, शेळगी) यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पूजा विनोद पारीख यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. विवाहानंतर चार ते पाच महिन्यांनी सासरकडील मंडळींनी बिझनेस करण्यासाठी माहेरून पैसे आण म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करत मारहाण केली.

माहेरून पैसे आणले तरच नांदवणार म्हणून वारंवार मारहाण करीत होते, असेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. दाईंगडे हे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: फसवणूकभिशी फायनान्ससोलापूर

संबंधित बातम्या

चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

​भीषण अपघात! मंगळवेढ्याजवळ क्रेटा कारचा चक्काचूर, ‘या’ कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; २ जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी; असा घडला थरकाप उडवणारा अपघात

June 10, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मंगळवेढा बस स्थानकावर प्रवास करताय? तर सावधान! गर्दीच्या ठिकाणी स्वतःच्या साहित्याची आणि पैशांची काळजी घ्या; वृद्ध शेतकऱ्याची पुंजी चोरट्याने उडवली

June 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मदरशात धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली अश्लील चाळे; सोलापूरच्या नराधम मौलानाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पीडितांचा आकडा वाढण्याची भीती

June 2, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! पंढरपूरनजीकच्या ‘त्या’ विचित्र अपघाताने हिरावला उमदा तरुण; मंगळवेढ्यातील भावी वकिलाची मृत्यूशी झुंज अपयशी

June 2, 2026

तरुणांनो सावधान! बॉडी फुगवण्यासाठी वापरले जाणारे घातक इंजेक्शन विकणारे रॅकेट जेरबंद; २ लाखांचा मुद्देमाल जप्त; सोलापूर जिल्ह्यात अवैध नशिल्या इंजेक्शनचा काळा बाजार उघड

June 1, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

पहिले लग्न आणि मुलगीही लपवली! नवरी नटून पोहोचली थेट जेलमध्ये; ३ मध्यस्थांवर गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात लग्न फसवणुकीचा मोठा भांडाफोड

May 27, 2026
Next Post
पुणे पदवीधरसाठी प्रा.डॉ.निलकंठ खंदारे अर्ज दाखल करणार

पुणे पदवीधरसाठी प्रा.डॉ.निलकंठ खंदारे अर्ज दाखल करणार

ताज्या बातम्या

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

डोक्यावरून पाणी गेलं अन् गोरेंनी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला, अनिल सावंतांच्या नेतृत्वात पंढरपुरात मोठा राजकीय भूकंप; भगीरथ भालकेंना मोठा धक्का

June 11, 2026
मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

मंगळवेढ्यात बेलदार हॉस्पिटलने वाचवले ‘या’ तरुणाचे प्राण; नातेवाईक नसतानाही डॉक्टरांनी दाखवली ‘देवमाणूसकी’

June 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

मंगळवेढ्यात थरार! पोलिसांना गुंगारा देऊन सब जेलमधून पळाला; पण पोलिसांच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने कर्नाटक गाठून ठोकल्या बेड्या

June 11, 2026
बळ वाढले! आ.समाधान आवताडे व बबनराव आवताडे यांचे मनोमिलन; कारखान्याच्या हितासाठी पाठिंबा केला जाहीर

दोन बैठका, एकच उमेदवार! मंगळवेढ्यात आवताडेंच्या ‘मायक्रो-प्लॅनिंग’ची चर्चा; काका-पुतण्याच्या लागोपाठ स्वतंत्र बैठका; राजकीय वर्तुळात खळबळ

June 10, 2026
​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

​मंगळवेढा-बोराळे रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी; ‘इतक्या’ दिवसांत काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; दगडांची माळ गळ्यात घालत शिवसेना आक्रमक

June 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! राज्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार; मात्र विदर्भासाठी नवी तारीख, वाचा..

June 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा