mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

खळबळ! कपड्यात लपविलेली कॉपी भरारी पथकाने शोधलीच; मंगळवेढ्यातील कॉपी प्रकार उघड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 2, 2024
in क्राईम, मंगळवेढा
उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला ‘हा’ इशारा पाहून वेळीच सावध व्हा..!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

बारावीच्या परीक्षेत बुधवारी वाणिज्य शाखेच्या चिटणिसाची कार्यपद्धती या पेपरवेळी मंगळवेढ्यातील संत दामाजी महाविद्यालय केंद्रातील एका विद्यार्थिनीने ओढणीत पिन लावून ठेवलेली कॉपी भरारी पथकाने शोधून काढली.

गुरुवारी विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र विषयाच्या पेपरवेळी माळशिरसमधील पिराळे केंद्रावर व कुडुवाडीतील भिसे कॉलेजवरील प्रत्येकी एका विद्यार्थिनीस कॉपी करताना भरारी पथकाने पकडले. भिसे कॉलेजवरील मुलीने कपड्यात कॉपी लपविली होती, असे भरारी पथकातील सूत्रांनी सांगितले.

इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू झाली असून, भाषा विषयाच्या पेपरला कोणीही कॉपी करताना सापडले नाही. परीक्षा कॉपीमुक्त व्हावी म्हणून महसूल व जिल्हा परिषदेची एकूण ४६ भरारी पथके नेमली आहेत.

सोलापूर जिल्ह्यात बारावीची १६ संवेदनशील केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना त्यांची अंगझडती घेतली जाते. तरीपण, न दिसेल अशा ठिकाणी अनेकजण कॉपी लपवितात. त्याचा भरारी पथकांकडून शोध घेतला जातो. गुरुवारी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता.

सोलापूर जिल्ह्यातील २९ हजार १६४ पैकी २८४ विद्यार्थी विविध कारणांमुळे परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत. २८ हजार ८८० विद्यार्थ्यांमध्ये दोनजण कॉपी करताना पकडले गेले.

आजपासून दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होत असून, जिल्ह्यातील १८२ केंद्रांवर ६५ हजार ७४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. विद्यार्थ्यांनी गैरप्रकार न करता आत्मविश्वासाने भयमुक्त वातावरणात पेपर लिहावा, असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाने केले आहे.

पहिली कारवाई

मंगळवेढा, माळशिरस व कुडुवाडी या तालुक्यांतील प्रत्येकी एका विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी भरारी पथकाने कारवाई केली आहे. त्यांचा अहवाल बोर्डाला पाठवून देण्यात आला आहे. ‘स्कॉड मॅडम’ म्हणून ओळख असलेल्या उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले यांनी दोन विद्यार्थ्यांवर कॉपीप्रकरणी कारवाई केली आहे.

गोंदिया या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेवेळी एकाच वर्षी ६५ विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती. चिटणिसाची कार्यपद्धती व रसायनशास्त्र या पेपरवेळी त्यांनी दोन कारवाया केल्या. या परीक्षेत बुधवारी जिल्ह्यातील पहिली कॉपी केस त्यांनीच केली.(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बारावी कॉपी

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
Next Post
सोलापुरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न? ईदगाहच्या समोर ‘लव्ह पाकिस्तान’ संदेश असलेल्या फुग्यांची विक्री; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्यात; आचारसंहिता 'या' तारखेच्या आसपास लागू होणार; मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वर्तवली शक्यता

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा