मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८६८ च्या वर गेली असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या बळींची संख्या ही अडीच ते तीन टक्के असेल असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात ती अंदाजापेक्षा जास्त म्हणजे ५ टक्के असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता ५००च्या जवळ पोहचला आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनाचे ४९० रुग्ण झाले असून ३४ मृत्यू झाले आहेत. मुंबईत मृत्युचं प्रमाण ७ टक्क्यांच्या जवळपास आहे.
कोरोना व्हायरसवर अजूनही औषध तयार झालेलं नाही. असं असलं तरी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही चांगलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज