टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरात एका बोलेरो गाडीची काच फोडून त्यामध्ये ठेवलेले १० लाख रुपये हातोहात चोरट्याने पळविल्याची घटना घडली असून या घटनेने मंगळवेढा शहर हादरून गेले आहे.
दरम्यान पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करुन त्या चोरट्याचा कसून शोध सुरु केला आहे. हे चोरटे बाहेरच्या राज्यातील असल्याचा पोलीसांचा कयास आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी प्रितम पाटील (वय २१, रा.नंदूर) यांचे आडत दुकान असून दि.१ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.४० च्या दरम्यान
मंगळवेढा शहरातील आप्पा बिर्यानी हाऊस समोर महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी क्र.एम.एच.१३ बी.एन.८०२१ मध्ये १० लाख रुपये बॅगेत ठेवले होते.
अज्ञात चोरट्याने बोलेरो गाडीची पुढील डाव्या दरवाज्याची काच फोडून फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरुन नेण्याचा प्रकार घडल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास शहर बीटचे पोलीस हवालदार माणिक पवार हे करीत आहेत.
दरम्यान पोलीसांना एक सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून डी. वाय.एस.पी. विक्रांत गायकवाड व पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी त्या फुटेजची कसून तपासणी केली आहे.
हे अज्ञात चोरटे बाहेरच्या राज्यातील असावे असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. प्रथमच चार चाकी वाहनात ठेवलेल्या एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्याने व्यापारी वर्गातून खळबळ उडाली आहे.
मंगळवेढा शहरात एकही सीसीटीव्ही कॅमेरा चौकामधून अथवा रोड वर नसल्यामुळे चोरट्यांचा शोध घेण्यास पोलीसांना तारेवरची कसरत करावी लागती आहे.
व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही बसविण्यास सहकार्य करावे
व्यापाऱ्यांनी एकमेकाच्या सहकार्याने आपल्या दुकानासमोर अथवा चौकातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास त्याचा फायदा दुकानदार व चोरी करुन जाणाऱ्या चोरट्यावर पोलीसांना नियंत्रण मिळविण्यात होणार असल्याने व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही बसविण्यास सहकार्य करावे अशा प्रतिक्रीया सुज्ञ नागरिकामधून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, मागील दोन महिन्यापुर्वी एका सेवानिवृत्त शिक्षकाने मोटर सायकलच्या डिक्कीत ठेवलेले पाच लाख रुपये पळविण्याचाही प्रकार घडला होता. मात्र अद्यापही त्या चोरट्यास पोलीसांना पकडण्यात यश आले नाही.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज