मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
नशा करण्याच्या हेतूने वापरले जाणारे परिशिष्ट एच प्रवर्गात मोडत असलेले अकरा बॉक्समध्ये ठेवलेल्या ५५ बाटल्या उत्तेजित औषधे करमाळा शहरात रणजीत उर्फ मलिंगा राजू मोरे याच्या जवळ सापडले असून त्याच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत करमाळा पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, करमाळा येथे प्रतिबंधित केलेल्या औषधाच्या तब्बल
१७,८३१ किमतीच्या बाटल्या अवैध मार्गाने प्राप्त करून विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती करमाळा पोलीस स्टेशनला मिळाली होती. त्यानुसार रणजीत उर्फ मलिंगा राजू मोरे (रा. रेणुका नगर, करमाळा, ता. करमाळा) याच्याकडे झडती घेतली असता
अकरा बॉक्समध्ये ठेवलेल्या ५५ बाटल्या उत्तेजित औषधे आढळून आली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने विजय विलास क्षीरसागर (रा. मंगळवार पेठ, करमाळा) याच्याकडून इंजेक्शन अवैधरित्या प्राप्त केली असल्याचे समोर आल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने करमाळा पोलीस ठाण्याकडील पोलीस सब इन्स्पेक्टर संदेश चंदनशिवे, वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत भराटे यांचे पथक मौलालीचा माळ
या ठिकाणी रवाना करून सदरील प्रतिबंधित इंजेक्शन विक्री करीत असलेल्या संशयित आरोपीस जागेवर मुद्देमालासह रंगेहात पकडून त्याच्याकडे मिळालेल्या प्रतिबंधित इंजेक्शन बाबत
चौकशी केली व सदर इसमाने विजय विलास क्षीरसागर (रा. मंगळवार पेठ) याच्याकडून विकत घेतली असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी सदर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
सदर गुन्ह्यात मिळून आलेले इंजेक्शन कमी रक्तदाबात वापरले जाते. सदर औषधाचा दुष्परिणाम हा थेट किडनीवर तसेच हृदयाचे आजार उद्भवण्यापर्यंत जाऊ शकतो. हे औषध परिशिष्ट एच मधील असल्याने डॉक्टरांच्या पूर्व परवानगीशिवाय विक्री करणे कायद्याने
गुन्हा आहे तरीपण नशा करण्याच्या हेतूने सदरील औषधांची विक्री केली जात असून याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यास कळविण्याचे आवाहन करमाळा पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.
सदरील कामगिरी पोलीस निरीक्षक रणजीत माने, पोलीस सब इन्स्पेक्टर संदेश चंदनशिव, पोलीस नाईक वैभव ठेंगील, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत भराटे, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद काटे यांनी पार पाडली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज