मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
कोरोनाच्या आजाराचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. मात्र यातील एका रुग्णाचा मुंबईच्या रहेजा रुग्णालयात शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची घटना घडली.
विनीत किणी असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर नायगावच्या पाचूबंदर येथील स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसई-विरार शहरात गेल्या काही अनेक दिवसांपासून कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. मागील आठवड्यात वसईत एक करोना रुग्ण आढळळा होता. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झालं होतं.
नायगावच्या खोचिवडे गावात राहणार्या विनित किणी (४३) याला त्याला अचानक ताप आला. दरम्यान त्याला न्युमोनिया झाला आणि श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्याला वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्याला माहिम येथील रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रहेजा रुग्णालायत करण्यात आलेल्या चाचणीत त्याला कोरोनाचे निदान झाल्याचे आढळून आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. करोनामुळे मृत्यू झाल्याने त्याच्या मृतदेह घरी न नेता थेट पाचूबंदर येथील स्मशानभूमीत आणून अंत्यसंस्कार करण्यात आले.
विनित हा नायगावमधील असला तरी वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतील नव्हता. त्याला न्युमोनियाचा झाला होता. त्याला श्वसनासाठी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले.
आम्ही खबरदारी घेत असून नागरिकांनी करोनाच्या संदर्भात लक्षणे आढळून आल्यास तातडीने करोना चाचणी करून घ्या, असे आवाहन पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी केले आहे.
खोचिवडे गावात घबराट
विनित किणी हा गेल्या काही दिवसांपासून सर्व सार्वजनिक कार्यक्रमात वावरत होता. त्यामुळे गावातील नागरिक आणि नातेवाईकांमध्ये घबराट पसरली आहे. पालिकेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज